जळगाव शहरातील बॅँक फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:23 PM2018-03-11T22:23:02+5:302018-03-11T22:23:02+5:30

युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून बॅँक आॅफ महाराष्टच्या नवी पेठ शाखेत ४८ लाख ९४ हजार ४८२ रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात शहर पोलिसांनी गोपाल गोविंदराव वानखेडे (वय ४५) व सुनील केशवराव पंडागळे (वय ३८) दोन्ही रा.निमगाव, ता.नांदूरा, जि.बुलढाणा या दोघांना रविवारी निमगाव, ता.नांदूरा येथून अटक करण्यात आली.

Two arrested in Jalgaon City Bank fraud case | जळगाव शहरातील बॅँक फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

जळगाव शहरातील बॅँक फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून केली फसवणूक४८ लाख ९४ हजार ४८२ रुपयांची फसवणूक  १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल


 आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,११ : युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून बॅँक आॅफ महाराष्ट च्या नवी पेठ शाखेत ४८ लाख ९४ हजार ४८२ रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात शहर पोलिसांनी गोपाल गोविंदराव वानखेडे (वय ४५) व सुनील केशवराव पंडागळे (वय ३८) दोन्ही रा.निमगाव, ता.नांदूरा, जि.बुलढाणा या दोघांना रविवारी निमगाव, ता.नांदूरा येथून अटक करण्यात आली.
नवी पेठेतील बॅँक आॅफ महाराष्ट मध्ये २७ डिसेंबर २०१६ ते १८ जानेवारी २०१७ या कालावधीत १३ जणांनी युपीआय या अ‍ॅपच्या माध्यमातून ४८ लाख ९४ हजार ४८२ रुपयांची फसवणूक केली होती. शाखा व्यवस्थापक छाया गिरीश भगूरकर यांच्या फिर्यादीवरु शहर पोलिसात १२ एप्रिल २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात यापूर्वी राजेश जनार्दन बुडुखले उर्फ सोनी (रा.निमगाव, ता.नांदूरा) याला अटक करण्यात आली आहे. तो १४ माचपर्यंत न्यायालयीत कोठडीत आहे. तपासाधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, हेडकॉन्स्टेबल संजय भांडारक, रमन गिते व माधव तरकुटे यांच्या पथकाने या दोघांना त्यांच्या मुळ गावी जावून अटक केली.दरम्यान, दोघांना न्या.व्ही.एच.खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Two arrested in Jalgaon City Bank fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.