जळगाव येथे पोलीस व्हॅनच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:55 PM2018-09-08T12:55:42+5:302018-09-08T12:56:51+5:30
महामार्गावर पुन्हा अपघात
जळगाव/नशिराबाद : भुसावळ न्यायालयातील कामकाज आटोपून सात कैद्यांना जळगावातील कारागृहात घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनने समोरून येणाºया दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात दुचाकीस्वार उमेश संजय वारूळे (वय-२३, रा़ शनिपेठ) हा तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेली तरूणी जयमाला प्रभाकर गायकवाड (वय-२६, रा़ हिवरखेडा ता़ जामनेर, ह.मु़भगवान नगर) हिचा उपचारदरम्यान मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव-भुसावळ महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ घडली़ दरम्यान, या अपघातात उलटलेल्या पोलीस व्हॅनमधील ५ पोलीस कर्मचारी तर सात कैद्यांपैकी दोन कैदी जखमी झालेले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे़
अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी भुसावळ न्यायालयात जिल्हा कारागृहातील सात कैद्यांच्या सुनावणीबाबत कामकाज होते़ त्यामुळे या सात कैद्यांना जिल्हा कारागृहातून भुसावळला पोलीस व्हॅनने (एमएच़१९़एम़०७१३) ने दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास हजर करण्यात आले होते. दुपारी न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर पुन्हा त्याच व्हॅनने कैद्यांना घेऊन शहराकडे येत असताना खेडीजवळील दूरदर्शन टॉवरजवळ समोरून येणारी दुचाकी (एमएच़१९़सीसी़८८३३) ओव्हर टेक करत असताना दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील उमेश संजय वारूळे हा तरूण जागीच ठार झाला़ तर दुचाकीवर मागे बसलेली जयमाला प्रभाकर गायकवाड ही गंभीर जखमी झाली़
व्हॅन दोनदा उलटली; हे झाले जखमी
अपघात झाल्यानंतर व्हॅनवरील चालक अनिल तायडे यांचे नियंत्रण सुटले़ अन् व्हॅन दोन वेळेस उलटली़ या घटनेत पोलिस कर्मचारी अनिल तायडे, प्रकाश काळे, गयाद्दीन शेख, दिलीप केंद्रे हे जखमी झाले. तर व्हॅनमधील आकाश गोसावी, गजानन जाधव,आकाश मोहने ह्या पोलीस कर्मचाºयांना मुकामार बसला. कैदी शेख कलीम शेख सलीम (वय-२७, रा़ भुसावळ),चंद्रभान सोनवणे (वय-२०,रा़जळगाव), सदाशिव पवार (वय-२१,रा़बोदवड), आनंद वानखेडे (वय-२३,रा़ यावल) आणि शेख अशरु शेख चांद (वय-३०,रा़बोदवड) हे किरकोळ जखमी झाले आहेत़ तर सुरेश बोदडे व भागवत सुर्यवंशी हे दोघं कैदी गंभीर जखमी झाले आहेत़ यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़
दोन तासांनी दोघांची पटली ओळख
अपघातानंतर जागीच ठार झालेला उमेश तर जखमी जयमाला या दोघांची ओळख पटत नव्हती़ अखेर दोन तासानंतर जिल्हा रूग्णालयात सुरक्षारक्षक असलेल्या तरूणाने जखमी तरूणीला पाहिल्यानंतर ती नातेवाईकच असल्याचे समोर आल्यानंतर ओळख पटली़ तर उमेश याच्या दुचाकीचा क्रमांकावरून ती दुचाकी कुणाची याचा एका पत्रकाराने शोध घेत मोबाईल क्रमांक मिळविला़ यानंतर दुचाकी मालक गणेश वारूळे यांना त्या पत्रकाराने रूग्णालयात बोलविले. गणेश वारूळे हे रूग्णालयात नातेवाईकांसह आल्यावर त्यांनी मृतदेह पाहताच तो पुतण्या असल्याचे ओळखले़ अन् जागेवर नातेवाईकांनी हंबरडा फोडला़
क्रेनच्या मदतीने उचलली व्हॅन
महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्याच्याकडेला उलटलेली पोलीस व्हॅनला उचलण्यासाठी क्रेन बोलविण्यात आली़ उमेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेता होता़ तर तरूणी ही बाहेर स्कूलमध्ये कंत्राटी पध्दतीने कामाला होती़