केटी वेअरमध्ये पडून दोघा भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:11 PM2019-09-08T18:11:58+5:302019-09-08T18:12:04+5:30

शिंदाडची घटना : मृत तरुण सिल्लोड येथील रहिवासी

Two brothers killed in Katie Ware | केटी वेअरमध्ये पडून दोघा भावांचा मृत्यू

केटी वेअरमध्ये पडून दोघा भावांचा मृत्यू

Next


शिंदाड ता पाचोरा - गावाजवळ असलेल्या केटी वेअरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या २ सख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण बचावला. मयत दोघेही तरुण हे सिल्लोड येथील रहिवासी होते. ते येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते.
या दुर्घटनेबाबत माहिती अशी की ,शिंदाड येथे रवींद्र लक्ष्मण सोनवणे यांच्याकडे मोहरम निमित्त उरुसचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त सर्व नातेवाईक जमा झाले होते. सोनवणे हे मयत तरुणांचे चुलत मामा होते. हे दोघे तरुण या कार्यक्रमासाठी येथे आले होते. यादरम्यान ते दोघे व आणखी एक तरुण असे तिघे जण कुटुंबात कुणालाही न सांगत शिंदाड गावजवाळ असलेल्या केटी वेअर मध्ये पोहण्यासाठी गेले मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने संदीप तात्याराव चव्हाण (वय २०) व निलेश अंबादास चव्हाण (वय १८) हे दोखे सख्खे चुलत भाऊ बुडून मृत पावले. तर अमर तात्याराव चव्हाण याला गावातील एका गुराख्याने वाचवले. पाण्यात दोघे तरुण बुडल्याची वार्ता पसरताच गावातील तरुण जमा झाले व पाण्यात उडी मारुन शोध घेतला. सुमारे अर्ध्या तासाने या दोघांचे शव आढळले.
याबाबत उषाबाई राजू सोनवणे यांचे खबरीवरुन पिंपळगाव हरे.पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
 

Web Title: Two brothers killed in Katie Ware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.