टायरमध्ये हवा भरतांना डिक्स तुटून दोघे भाऊ गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 06:16 PM2019-06-03T18:16:29+5:302019-06-03T18:17:04+5:30
वरखेडी येथील घटना
वरखेडी, ता. पाचोरा : सरबत विक्रीच्या वाहनाच्या टायर मध्ये हवा भरतांना हवा जास्त भरली गेल्यामुळे डिक्स तुटून उडाली. या डिक्सचा फटका बसल्याने तौसिफ शे. रियाज (वय१८) व फरहान शे. रियाज (वय ६) रा.भोकरी या भावांच्या तोंडाला व डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले. ही घटना २ रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या दरम्यान वरखेडी येथील अस्लम टायर दुकानावर घडली.
तौसिफ शे.रियाज हा स्वत:च्या हाताने टायर मधे हवा भरत असतांना हवा जास्त भरत असताना ही घटना घडली. यावेळी आजुबाजुस उपस्थितांनी दोघा जखमींना तातडीने वरखेडी येथील डॉ.जितेंद्र चौधरी व डॉ.सरला चौधरी यांच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. दोघांना पंधरा-पंधरा टाके घालून जखम शिवण्यात आली व योग्या ते उपचार करण्यात आले.
सध्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यातील शेवटचे पर्व सुरू असताना पोटापाण्यासाठी धडपड करणाºया मुलांसोबत अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.