जळगावात पूर्णा नदीच्या डोहात बैलगाडी पडून शेतक-यासहीत दोन बैलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 01:59 PM2017-09-04T13:59:58+5:302017-09-04T14:00:19+5:30
जळगावात शेतक-याची बैलगाडी पूर्णा नदीच्या डोहात पडून त्यांच्यासहीत दोन बैलांचाही मृत्यू झाला आहे.
जळगाव, दि. 4 - किटकनाशक फवारणीसाठी पाणी आणण्यास गेलेल्या शेतक-याची बैलगाडी पूर्णा नदीच्या डोहात पडून त्यांच्यासहीत दोन बैलांचाही मृत्यू झाला आहे. संजय सदाशिव कारगुडे (वय 27 वर्ष) असे मृत शेतक-याचे नाव आहे. संजय कारगुडे हे मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावातील रहिवासी होते.
सोमवारी ( 3 सप्टेंबर) सकाळी 9 वाजण्यास सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातातून त्यांचा चुलत भाऊ सुखरुप बचावला आहे. संजय कारगुडे चुलत भाऊ नितीन कारगुडे (वय 18 वर्ष) याच्यासह बैलगाडीवरुन पाण्याचा बॅरल घेऊन पूर्णा नदीत पाणी आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान बैलगाडी पाण्याच्या डोहात पडली आणि डोहात बुडून संजय यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, संजय कारगुडे यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.