ममुराबादजवळ दोन बससेची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 08:14 PM2019-09-13T20:14:15+5:302019-09-13T20:15:42+5:30

बैलगाडी वाचविण्याच्या नादात अपघात : १५ विद्यार्थी झाले जखमी

Two buses collide face-to-face near Mamurabad | ममुराबादजवळ दोन बससेची समोरासमोर धडक

ममुराबादजवळ दोन बससेची समोरासमोर धडक

Next

जळगाव- बैलगाडी वाचविण्याच्या नादात नांद्राहून धामणगावकडे जाणाऱ्या एसटी बसने समोरून येणाºया ट्रॅव्हल्स् बसला धडक दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी ममुराबादजवळील फार्मसी महाविद्यालयाजवळ घडली़ या अपघातात १५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले़ दरम्यान, अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़
मिळालेली माहिती अशी की, जळगाव डेपोची बस (क्र ़ एमएच़१२़एएल़१४२८) ही शुक्रवारी दुपारी नांद्राहून धामणगावकडे जळगावमार्गे जात होती. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास मामुराबाद फार्मसी महाविद्यालयाजवळून एसटी बस जात असताना बैलगाडी अचानक समोर आली़ तिला वाचविण्याच्या नादात समोरून येणाºया मध्यप्रदेशातील बसला (क्रमांक़ एमपी़ ०९़एफए़५५८१) जोरदार धडक दिली.
विद्यार्थी किरकोळ जखमी
एसटीबसमध्ये विद्यार्थी प्रवास करित होते़ अपघातानंतर या बसमधील १५ विद्यार्थी किरकोळ जखमी झाली असून परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले होते़ त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली होती़ सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झालेली नाही़ तोच जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ दुसºया वाहनातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले़
असे आहेत जखमी विद्यार्थी
मोहिनी वनराज सपकाळे, हरेश्वर ज्ञानेश्वर सोनवणे, रोहिणी अरुण सपकाळे, माया शिवदास सोनवणे, रोहित ज्ञानेश्वर न्यायदे, स्नेहा भास्कर भालेराव, मिताली विजय सोनवणे, सोनल गोपाल विसपुते, सुपडु सपकाळे, धर्मेश संजय सपकाळे, अक्षय विजय भालेराव, अक्षय गोपाल भालेराव, विक्रम नथ्थु सपकाळे, दिनकर सुनिल सपकाळे आणि वैभव घनश्याम खेडकर (सर्व रा. धामणगाव, ता़जि़जळगाव) असे १७ ते १९ वयोगटातील विद्यार्थी जखमी झाले आहेत़ यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहे़
 

Web Title: Two buses collide face-to-face near Mamurabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.