लोहारीजवळ दोन बसेसचा अपघात, सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:13 IST2020-12-12T22:12:25+5:302020-12-12T22:13:14+5:30
लोहारी जवळील झोपडपट्टी वस्ती लगत बसेसची समोरासमोर धडक होऊन सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

लोहारीजवळ दोन बसेसचा अपघात, सात जखमी
पाचोरा : जामनेर आगाराच्या सुरत-जामनेर, जामनेर-मालेगाव या दोन्ही बसेसची लोहारी जवळील झोपडपट्टी वस्ती लगत बसेसची समोरासमोर धडक होऊन सात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सुरतहून जामनेरकडे जाणारी बस (एमएच२०-३४७३) या गाडीस जामनेरहून मालेगावकडे जाणारी गाडी (एमएच४०वाय ५१९५) या बसची समोरासमोर धडक झाली. यात ७ प्रवासी जखमी झाले. महामंडळातर्फे पाचोरा आगार व्यवस्थापक देवेंद्र वाणी, स्थानक प्रमुख मनोज तिवारी यांनी प्रत्येकी एक हजार रुपये मदत अनुदान म्हणून देऊन दिले.
जामनेर मालेगाव या बसमधील प्रवासी यशवंत धर्मा निकम (५३, चाळीसगाव), संध्या दयाराम वांगीकर (४७, जामनेर), संजीव रामचंद्र ठाकरे (५३, जामनेर), निर्मला बाबुराव बोंडे (६०, पहुर), गुरुदल महाजन (५२, सुनसगाव), तसेच सुरत जामनेर गाडीचे चालक सोपान श्रीराम थाटे, एम. के. चौधरी जामनेर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.