वरखेडी पाचोरा रोडवर दोन बसेसचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:09 IST2020-12-12T22:06:56+5:302020-12-12T22:09:05+5:30
लोहारीगावाजवळील इंदिरा आवास वस्तीजवळ रस्त्यावर पडलेल्या छीड-छीड पाण्यामुळे रोड निसरडा झालेला असल्याने दोन बसेसची धडक होउन अपघात झाला.

वरखेडी पाचोरा रोडवर दोन बसेसचा अपघात
ठळक मुद्देसुदैवाने जिवितहानी टळली
व खेडी ता. पाचोरा : शनिवारी सायंकाळी ४:३० वाजता वरखेडी पाचोरा रोडवर लोहारीगावाजवळील इंदिरा आवास वस्तीजवळ रस्त्यावर पडलेल्या छीड-छीड पाण्यामुळे रोड निसरडा झालेला असल्याने दोन बसेसची धडक होउन अपघात झाला.जामनेर आगाराच्या सुरतहून-जामनेरकडे जाणारी बस (एमएच २० बीएल ३४७३) व जामनेरहून मालेगावकडे जाणारी बस (एमएच ४०वाय५१९५) या दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. सुरत-जामनेर बसचे चालक सोपान थाटे व जामनेर मालेगाव बसचे चालक एस. बी. चित्ते हे किरकोळ जखमी झाले. सुरत-जामनेर बसच्या मागे दुचाकी (एमएच१९/सीबी५९४६)वर पाचोरा येथील गजानन दूध डेअरीचे संचालक स्वप्नील पाटील हे आपल्या कर्मचाऱ्यांसह येत होते. लोहारी ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला.दुचाकीस्वार बचावलेमालेगाव जामनेर बसच्या धडकेने सुरत जामनेर बस मागे नाल्यात रोडच्या खाली फेकली गेल्याने दुचाकीवरील दोघे दैव बलवत्तर म्हणून बालंबाल बचावले. त्यांची मोटरसायकल सुरत-जामनेर बसच्या खाली दबली गेली. दोघं दुचाकीस्वार सुखरूप होते. याठिकाणी पोलीस मात्र उशिरा आल्याने दोन्ही बाजूने वाहतूक विस्कळीत झाली व दुतर्फा एक किमीपर्यंत लांबच लांब वाहनांची रांग लागली होती.