रिगाव येथे शेतात दिसले बिबट्याचे दोन बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 10:03 PM2020-01-14T22:03:37+5:302020-01-14T22:03:43+5:30
वन विभाग सजग
कुºहाकाकोडा, ता. मुक्ताईनगर : उसतोडणी करणाऱ्या मजुरांना उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्याने रिगाव शिवारात एकच खळबळ उडाली आहे. रिगाव व कोºहाळा गावातील मजूर व शेतकऱ्यांमध्ये यामुळे कमालीची दहशत पसरली आहे. शेती शिवारातील बिबट्याच्या उपस्थितीने शेती कशी कसायची ? या विवंचनेत शेतकरी असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
रिगाव गावापासून काही अंतरावर असलेल्या गट क्र. ८ मधील संतोष विटे यांच्या शेतात सकाळी १० च्या दरम्यान अचानक बिबट्याचे दोन बछडे खेळताना आढळले मात्र कानोसा घेतला असता मादी आढळून आली नाही.
वन विभाग सजग
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मादीआणि तिच्या पिल्लांची हालचाल टिपण्यासाठी त्यांनी आजूबाजूच्या परिसरात कॅमरे लावले आहेत. मादी पिल्लांना सुरक्षित स्थळी नेईपर्यंत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार असून बिबट्यांची मादी जर आलीच नाही तर या पिल्लांच्या सुरक्षेसाठी वन विभागाकडून पर्यायी पावले उचलली जातील, तोपर्यंत शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांनी केले आहे.