बोदवड मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर दोघे आले धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 17:56 IST2020-07-22T17:53:31+5:302020-07-22T17:56:44+5:30
चक्की सुरू करण्यासाठी नगरपंचायतीने ना हरकत दाखला न दिल्याने दोन जणांनी नगरपंचायतीत गोंधळ घातला. दोघे जण मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून आले.

बोदवड मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर दोघे आले धावून
गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : चक्की सुरू करण्यासाठी नगरपंचायतीने ना हरकत दाखला न दिल्याने दोन जणांनी नगरपंचायतीत गोंधळ घातला. दोघे जण मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून आले. बुधवारी सकाळी अकराला ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनुसार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले आपल्या दालनात होते. त्यावेळी नगराध्यक्षा मुमताज बी बागवान व त्यांचे पती सईद बागवान हेदेखील हजर होते. तेव्हा शहरातील शेख अकील शेख इमाम व त्याचा भाऊ शेख जावेद शेख इमाम हे दोन्ही जण आले व मुख्याधिकाºयांना उद्देशून म्हणाले, ‘साहेब, आम्ही चक्की सुरू करण्यासाठी ६ जुलै रोजी अर्ज दिला आहे. मात्र अद्याप ना हरकत दाखला का मिळाला नाही?’ यावर मुख्याधिकाºयांनी संबंधित विभागप्रमुख व कर्मचाºयांना विचारणा केली. तेव्हा अर्जात त्रुटी असून, अगोदरच सिंगल फेजच्या वीज जोडणीवर चक्की सुरू आहे, त्यामुळे ना हरकत दाखला दिला नसल्याचे मुख्याधिकाºयांनी सांगितले. याचा दोघांना राग आला व ते मुख्याधिकाºयांना शिवीगाळ करीत अंगावर धावून आले. तेव्हा उभ्या असलेल्या इतर कर्मचाºयांनी त्यांना रोखले.
नंतर या दोघांना कर्मचाºयांनी समज देवून कार्यालयाबाहेर काढले. यावर कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण, अमित कोलते, रितेश बच्छाव, जगताप व इतर कर्मचाºयांनी पोलीस ठाणे गाठले. मुख्याधिकाºयांनी फिर्याद दिली. त्यावरून शेख अकील शेख इमाम व त्याचा भाऊ शेख जावेद शेख इमाम या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व शिवीगाळ केल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.