कमी दिवसांत जन्मलेल्या दोन बालकांना लाभली दृष्टी

By अमित महाबळ | Published: August 27, 2022 09:19 PM2022-08-27T21:19:14+5:302022-08-27T21:19:25+5:30

कमी दिवसांत जन्मलेल्या प्रत्येक बाळाच्या डोळ्याची तपासणी केली जाते. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीची (आरओपी) शक्यता असलेल्या बाळांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यांची दृष्टी जाण्याचा मोठा धोका असतो

Two children who were born within a few days got sight | कमी दिवसांत जन्मलेल्या दोन बालकांना लाभली दृष्टी

कमी दिवसांत जन्मलेल्या दोन बालकांना लाभली दृष्टी

googlenewsNext

अमित महाबळ - जळगाव 

जळगाव - कमी दिवसांत जन्मलेल्या मुलांना काचेच्या पेटीत ठेवले जाते एवढी एकच गोष्ट सर्वसामान्यांना माहित आहे पण अशा मुलांची नजरदेखील जाऊ शकते. ही मुले कायमची दृष्टी गमावू शकतात. अशा दोन बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या (आरबीएसके) पथकाने केलेल्या प्रयत्नांमुळे दृष्टी लाभली आहे.

कमी दिवसांत जन्मलेल्या प्रत्येक बाळाच्या डोळ्याची तपासणी केली जाते. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीची (आरओपी) शक्यता असलेल्या बाळांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यांची दृष्टी जाण्याचा मोठा धोका असतो. त्यांच्यावर उपचार म्हणजे इंजेक्शनचा कोर्स असतो. पाथरी व भुसावळच्या प्रत्येकी एका रुग्णावर चालू वर्षीच्या जून व जुलै महिन्यात हा उपचार करण्यात आला आहे. या दोघांचे वजनही कमी होते. त्यांना इंजेक्शन मिळावेत म्हणून आरबीएसकेच्या पथकाने प्रयत्न केले. सामाजिक योगदानातून हे काम पूर्ण केले गेले, अशी माहिती जिल्हा समन्वयक वर्षा वाघमारे यांनी दिली.

असा आहे आरओपी

मुदतपूर्व वा वेळेआधी जन्म, जन्मत: वजन कमी असणे हे आरओपीचे प्रमुख घटक आहेत. यामध्ये डोळ्याच्या मागच्या पडद्याची (रेटिना) पूर्णपणे वाढ झालेली नसते. बाळ जेव्हा २८ ते ३० आठवडे किंवा त्याच्या अगोदर जन्मते त्या वेळेस त्याचे वजन पूर्ण भरत नाही. त्याची रेटिनाची वाढ पूर्ण झालेली नसते. त्याची काळजी घेणे या हेतूने किंवा फुफ्फुसाची वाढ पूर्ण झालेली नसते म्हणून बाळाला एनआयसीयूमध्ये काचेच्या पेटीत ठेवले जाते. त्याला तेथे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो, पोषक आहार दिला जातो. मात्र, या सर्व गोष्टींचा बाळाच्या मागच्या पडद्यावर प्रभाव पडतो आणि त्याला आरओपी होतो.

या बालकांमध्ये प्रमाण जास्त

आरओपीचे प्रमाण व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या बाळांमध्ये जास्त असते. आरओपीचे तीन झोन आहेत. पहिल्या झोनमध्ये अंधत्व येण्याची शक्यता अधिक असते. दुसऱ्या फेजमध्ये कमी आणि तिसऱ्यामध्ये कमी असते, अशी माहिती जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय धुमाळे यांनी दिली.

Web Title: Two children who were born within a few days got sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.