जळगावात दोन चॉपर व एक तलवार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:17 PM2018-05-13T12:17:08+5:302018-05-13T12:17:08+5:30

पाच जणांना अटक

Two choppers and a sword were seized in Jalgaon | जळगावात दोन चॉपर व एक तलवार जप्त

जळगावात दोन चॉपर व एक तलवार जप्त

Next
ठळक मुद्देएक अल्पवयीन, एक संशयित फरारआव्हाणे शिवारात सत्यम पार्कजवळ एका जणाकडे तलवार

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १३ - पांझरापोळ परिसरातील पानटपरीवर चार तलवारी व बस स्थानकात एक गावठी पिस्तुल सापडल्याची घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा शिव कॉलनीत तीन तरुणांकडे तर अयोध्या नगरात एका जणाकडे चॉपर आढळून आला तर आव्हाणे शिवारात सत्यम पार्कजवळ एका जणाकडे तलवार आढळून आली. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून अनुक्रमे रामानंद नगर व तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशुतोष अनिल सोनार (वय १९, रा.पहुर, ता.जामनेर), शुभम विकास अत्तरदे (वय १९, रा.शंकरराव नगर, जळगाव) व एक अल्पवयीन अशा तिघांना रामानंद नगर पोलिसांनी शनिवारी दुपारी चार वाजता पकडले. उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, प्रदीप चौधरी, रवींद्र कापडणे, शरद पाटील व सागर तडवी यांचे पथक गस्तीवर होते. संशयावरुन तिघांची चौकशी केली असता आशुतोष सोनार याच्या कमरेला चॉपर आढळून आला.स्वप्नील सखाराम सोनवणे (रा.जैनाबाद, जळगाव) हा फरार झाला.
अयोध्या नगरात चॉपर पकडला
अयोध्या नगरात देशमुख डेअरीजवळ संदीप रमेश पवार (वय ३१, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यालाही एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले. उपनिरीक्षक रोहन खंडागळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, अतुल पाटील, विजय पाटील व मनोज सुरवाडे यांच्या पथकाने संदीप याला चॉपरसह अटक केली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात चाकू व तलवार हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. तीन महिन्यांवर मनपाची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. आणखी काही दिवस ही मोहिम शहरात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.
आव्हाणे शिवारात आढळली तलवार

आव्हाणे शिवारात सत्यम पार्क परिसरात एक तरुण तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे जितेंद्र सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सहायक निरीक्षक सचिन बागुल, राजेंद्र बोरसे,जितेंद्र सानेवणे, पोपट सोनार व विजय पाटील यांचे पथक रवाना केले होते. या पथकाला अनिल एकनाथ सपकाळे (वय २९ रा.निमखेडी, ता.जळगाव) हा तरुण आढळून आला.

Web Title: Two choppers and a sword were seized in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.