सावद्याजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले
By admin | Published: May 4, 2017 12:31 PM2017-05-04T12:31:50+5:302017-05-04T15:43:15+5:30
रेल्वे वाहतूक सुरळीत : अनेक गाडय़ांना झाला विलंब
Next
ऑनलाईन लोकमत विशेष /पंढरीनाथ गवळी
भुसावळ, दि.5- मध्य प्रदेशातील इटारसीकडून येणारी बीसीएन/एचएल या मालगाडीचे (रिकामे) दोन डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची या मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक विस्कळीत झाली होती. डबे रुळावरुन घसरण्याची घटना गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भुसावळ विभागातील सावदा रेल्वेस्थानकातील अप लाईनवर घडली. या घटनेमुळे अप मार्गावरील मुंबईकडे जाणा:या मेल/एक्स्प्रेस गाडय़ांना अनेक तास उशीर झाला. दरम्यान, पहाटे 4.30 अपघातग्रस्त डबे रुळावरुन रात्रीच युद्ध पातळीवर काम करुन रात्रीच उचलण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटे 4.30 वाजता अप मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
मालगाडीचे डबे घसरल्याची माहिती मिळताच भुसावळ येथून तातडीने एसीआर गाडी (अॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन) अपघात स्थळी रवाना झाली. संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी थांबून होते. डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम अरुण धार्मिक, सिनिअर डीसीएम सुनील मिश्रा आदी अधिकारी डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षात लक्ष ठेवून होते. पहाटे 4.30 वाजता वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
या गाडय़ांना झाला विलंब
दिल्लीकडून येणारी (अप मार्गावरील) 12630 स्वर्ण जयंती एक्स्प्रेस, 12618 मंगला एक्स्प्रेस, 13201 जनता एक्स्प्रेस, 12321 हावडा मेल व्हाया अलाहाबाद, 12187 गरीब रथ 15101 जनसाधारण एक्स्प्रेस या गाडय़ांना चार-ते पाच तास विलंब झाला. त्याउशीराने धावत आहेत. पहाटे अडीच वाजता जाणारी गरीब रथ सकाळी 7.7 वाजता येथून रवाना झाली.