हरदा-इटारसीजवळ रेल्वेच्या मालगाडीचे दोन डबे घरसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 06:29 PM2017-11-01T18:29:50+5:302017-11-01T18:44:02+5:30
भिरंगी रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय
आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.१ : मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील हरदा-इटारसी दरम्यान भिरंगी रेल्वे स्थानकाजवळ भुसावळकडे कोळसा घेऊन येणाºया मालगाडीचे दोन डबे घसरले. सुदैवाने यात जिवितहानी टळली. ही घटना बुधवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, भुसावळ येथील रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार रुळावरुन घसरलेले मालगाडीचे डबे उचलण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातातमुळे या मार्गावरुन धावणाºया अनेक प्रवाशी गाड्या पाच ते सहा तास विलंबाने धावत आहेत.
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार मालगाडी क्रमांक पीएसएसएस ही भोपाळकडून भुसावळकडे कोळसा घेऊन येत असताना हरदा-इटारसी रेल्वे स्थानका दरम्यान या गाडीचे दोन डबे रेल्वे रुळावरुन घसले. त्यामुळे यामार्गावरील मध्य रेल्वेची दिल्ली-मुंबई दरम्यानची प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली. गोवा, राजेंद्रनगर एक्स्प्रेससह अनेक प्रवाशी गाड्या उशीराने धावत होत्या.
या गाड्या धावणार विलंबाने
४१२८७० जम्मूतवी-गोवा एक्स्प्रेस, १२१४२ पटना-एलटीटी राजेंद्रनगर, १९०४२ वाराणसी-सुरत, १५०१८ गोरखपूर-एलटीटी, १२५३३ लखैना-मुंबई पुष्पक,१५६४६ गोहाटी-एलटीटी, १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस या गाड्या सुमारे पाच ते सहा तास उशीराने धावत होत्या. अपघात अप मार्गावर घडला. त्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत होती.