गैरहजर राहणारे दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:25 PM2019-04-20T12:25:17+5:302019-04-20T12:25:43+5:30

जळगाव : निवडणूक स्थिर सर्व्हेक्षण फिक्स पॉर्इंटला नेमणूक असताना येथे अनाधिकृतरित्या गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले ...

Two cops staying absent suspended | गैरहजर राहणारे दोन पोलीस निलंबित

गैरहजर राहणारे दोन पोलीस निलंबित

googlenewsNext

जळगाव : निवडणूक स्थिर सर्व्हेक्षण फिक्स पॉर्इंटला नेमणूक असताना येथे अनाधिकृतरित्या गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे़ धरणगाव पोलीस ठाण्याचे हेकॉ. कैलास पाटील व जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे हेकॉ.राजेंद्र बोरसे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे़
लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून प्रत्येक मतदार संघात फिक्स स्थिर सर्व्हेक्षण फिक्स पार्इंट नेमण्यात आलेले आहेत़ यातील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ १८ एप्रिल रोजी चार ते बारावाजेपर्यंत दोघांची नेमणूक करण्यात आली होती़ मात्र, धरणगाव पोलीस निरीक्षकांनी साडेचार वाजेच्या सुमारास या पॉर्इंटवर तपासणी केली असता हे दोघेही कर्मचारी गैरहजर आढळले़ हे वर्तन गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगत पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांनी या दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे़ दरम्यान, निलंबित काळात त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयात असेल, त्यांना दररोज सकाळी, संध्याकाळी पोलीस निरीक्षकांकडे हजेरी लावावी लागणार आहे़ शिवाय या काळात त्यांनी काही खासगी नोकरी केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे़

Web Title: Two cops staying absent suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव