पाचोऱ्यात दोन दिवसीय हिंदी परिषदेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:03 AM2020-01-11T01:03:58+5:302020-01-11T01:05:28+5:30

राज्यभरातील नामवंत हिंदी साहित्यिकांच्या मांदियाळीने पाचोरा महाविद्यालयाचा परिसर अक्षरश: फुलला तर त्यानिमित्त आयोजित अपूर्णांक या दोन अंकी नाटकाने रसिकांची पूणार्कांत दाद मिळवली. निमित्त होते महाराष्ट्र हिंदी परिषदेचे २७वे अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्राचे. या दोन दिवसीय हिंदी साहित्यविषयक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील हिंदी साहित्यिक येथे एकत्रित आले आहेत.

A two-day Hindi conference begins in Pachora | पाचोऱ्यात दोन दिवसीय हिंदी परिषदेला प्रारंभ

पाचोऱ्यात दोन दिवसीय हिंदी परिषदेला प्रारंभ

Next
ठळक मुद्देअपूर्णांक पूर्णांकांंत रंगलेनाट्यरसिकांची दाद

पाचोरा, जि.जळगाव : राज्यभरातील नामवंत हिंदी साहित्यिकांच्या मांदियाळीने पाचोरामहाविद्यालयाचा परिसर अक्षरश: फुलला तर त्यानिमित्त आयोजित अपूर्णांक या दोन अंकी नाटकाने रसिकांची पूणार्कांत दाद मिळवली.
निमित्त होते महाराष्ट्र हिंदी परिषदेचे २७वे अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्राचे. या दोन दिवसीय हिंदी साहित्यविषयक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील हिंदी साहित्यिक येथे एकत्रित आले आहेत. अत्यंत देखणा असा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर बीजभाषण व विविध विषयावर साहित्यिकांनी मार्गदर्शन केले. ११ रोजी समारोप होणार आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या एम.एम.महाविद्यालय स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने हिंदी विभागाच्यावतीने महाराष्ट्र हिंदी परिषदेचे २७वे अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्र १० व ११ रोजी ‘हिंदी साहित्य और आशिका समाज’ या विषयावर दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
१० रोजी सकाळी परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध उपन्यासकार भगवानदास मोरवाल (दिल्ली) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, संचालक सुरेश देवरे, डॉ.जयंत पाटील, प्रा.सुभाष तोतला, खलील देशमुख, हिंदी परिषदेचे सचिव डॉ.गजानन चव्हाण, हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ.मधु खराटे, प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नाना गायकवाड, प्रा.पांडुरंग पाटील, प्राश्रकृष्णा पोद्दार, प्रा.अनिल साळुंखे, उपप्राचार्य प्रा.डॉ.वासुदेव वले, अधिवेशनाचे समन्वयक प्रा.डॉ.जे.व्ही.पाटील उपस्थित होते .
अधिवेशनानिमित्ताने राज्यभरातील हिंदी प्राध्यापकांनी सादर केलेल्या २०३ शोधनिबंधाचे 'सार्थक उपलब्धी' या ग्रंथाद्वारे प्रकाशन करण्यात आले. भगवानदास मोरवाल यांच्या 'वंचना' या कादंबरीचे प्रकाशन झाले. उत्कृष्ट शोधनिबंध सादर केल्याबद्दल प्रा.दादासाहेब खांडेकर (सोलापूर ) यांचा तसेच डॉ.मधु खराटे यांचा सेवानिवृत्ती व महाराष्ट्र हिंदी परिषदेचे सलग १२ वर्षे अध्यक्षपद भुषविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या वेबसाईटचे लोकार्पण यावेळी करण्यात आले .
याप्रसंगी खलील देशमुख, भगवानदास मोरवाल, व्ही.टी.जोशी, संजय वाघ यांची भाषणे झाली. उद्घाटन सोहळ्यानंतर भगवानदास मोरवाल यांचे बीजभाषण झाले. दुपारच्या सत्रात' उपन्यास साहित्य और आशिका समाज 'या विषयावर डॉ बाबासाहेब कोकाटे (बीड) डॉ.सुनील कुलकर्णी यांनी मते मांडली. डॉ.सुनीता कावळे यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर 'नाट्य साहित्य और हाशिएका समाज ' या विषयावर डॉ.मिथिलेश अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.कामिनी तिवारी यांचे भाषण झाले. 'काव्य और हाशिएका समाज 'या विषयावर डॉ गौतम कुवर यांनी मत मांडले .डॉ प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
शुक्रवारी चार सत्रात या अधिवेशनाचे कामकाज चालले. रात्री आठ वाजता 'अपूर्णांक' या नाटकाचा प्रयोग झाला. त्यासाठी डॉ.जयंतराव पाटील यांनी प्रायोजकत्व स्वीकारले. सहज सुंदर अभिनय आणि रसिकांच्या ह्रदयाला हात घालणारा आशय यामुळे हे नाटक रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून गेले. बीजभाषणात व मान्यवरांच्या मनोगतात हिंदी भाषा, हिंदी साहित्य याबाबत साधक-बाधक विचार मांडण्यात आले. प्रा.डॉ.जे.व्ही.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.उर्मिला पाटील यांनी आभार मानले.
अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रा.अनुराधा पवार, प्रा.क्रांती सोनवणे, प्रा.उर्मिला पाटील, प्रा.माधुरी ठाकरे, प्रा.राजेश मांडोळे, प्रा.डॉ.जे.डी.गोपाळ, सुनील पाटील, रमेश गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: A two-day Hindi conference begins in Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.