प्रताप महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्रास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 07:55 PM2020-01-18T19:55:53+5:302020-01-18T19:57:34+5:30
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात (स्वायत्त) शनिवारपासून राज्य वाणिज्य परिषदेच्या ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ झाला.
अमळनेर, जि.जळगाव : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात (स्वायत्त) शनिवारपासून राज्य वाणिज्य परिषदेच्या ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ झाला. त्यात वाणिज्य आणि व्यवस्थापनातील संधी आणि आव्हाने यावर तज्ज्ञ तथा संशोधकांनी महत्वपूर्ण उहापोह केला.
महाविद्यालयाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त वाणिज्य व व व्यवस्थापन प्रशाळेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे राष्ट्रस्तरीय चर्चासत्र त्याचाच एक भाग आहे. देशभरातून १५० प्रतिनिधींनी नावे नोंदवली आहेत. त्यात मुख्य विषयाशी संबंधित जवळपास शंभर विषयांवर विचारमंथन सुरू झाले आहे. उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी होते. परिषदेसाठी संसाधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते.
चर्चासत्राचे सचिव उपप्राचार्य एस.ओ.माळी व विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. प्राचार्या डॉ.ज्योती राणे यांनी प्रास्ताविक केले. संचालक नीरज अग्रवाल यांनी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. राज्य वाणिज्य परिषदेचे सचिव प्रा.डॉ.जी.वाय. शितोळे, प्रा.आर.आर.बहुगुणे व प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रतापियन तथा मुंबई विद्यापीठाचे डीन डॉ.अजय भामरे, प्राचार्य लक्ष्मण कारांगळे, प्राचार्य अजय पेठे, प्रा.डॉ.पूनम कक्कड, प्रा.डॉ.विनोद गावंडे यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना सन्मानित आले.'इ जर्नल' व 'आम्ही प्रतापियन'चे आमदार पाटील यांनी विमोचन केले.
प्रा.डॉ.तुंटे व प्रा.कल्पना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.पी.टी. चौधरी यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम,उपाध्यक्ष कमल कोचर व माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, कायोर्पाध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, संचालक डॉ.बी. एस. पाटील, जितेंद्र जैन, हरी भिका वाणी, चिटणीस प्रा.डॉ.अरुण कोचर, प्राध्यापक प्रतिनिधी पी.आर.भुतडा, शिक्षक प्रतिनिधी डिगंबर महाले व परिषदेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी प्रा. किशोर जगदेव, प्रा. डॉ. योगेश तोरवणे, प्रा.किरण सूर्यवंशी, प्रा.किरण भागवत, प्रा.ज्ञानेश्वर मराठे, प्रा.अनिल शेळके आदी परिश्रम घेत आहेत.