मध्य रेल्वेतर्फे दोन दिवस ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:50+5:302021-03-13T04:28:50+5:30

भुसावळ :- मध्य रेल्वे प्रशासनातर्फे १३ व १४ मार्च रोजी कल्याण आणि कसारा खंड अप/डाऊन दिशेमध्ये तीन स्थानकांवर ...

Two days traffic and power block by Central Railway | मध्य रेल्वेतर्फे दोन दिवस ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेतर्फे दोन दिवस ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक

Next

भुसावळ :- मध्य रेल्वे प्रशासनातर्फे १३ व १४ मार्च रोजी कल्याण आणि कसारा खंड अप/डाऊन दिशेमध्ये तीन स्थानकांवर ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम भुसावळ विभागातील गाड्यांवर होणार आहे. यात काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.

या गाड्यांवर परिणाम

०११४१ डाउन मुंबई आदिलाबाद विशेष १२ रोजी रद्द

०११४२ अप आदिलाबाद मुंबई विशेष १३ रोजी रद्द

०७०५७ डाउन मुंबई सिकंदराबाद विशेष १४ रोजी रद्द

०७०५८ अप सिकंदराबाद मुंबई विशेष १३ रोजी रद्द

०७६१८ डाउन मुंबई नांदेड विशेष १४ रोजी रद्द

०७६१७ अप नांदेड मुंबई १३ रोजी रद्द

०२१९८ अप जबलपूर कोईमतुर १३ रोजी रद्द

०२१९७ डाऊन कोईमतूर जबलपूर १५ रोजी रद्द करण्यात आली आहे.

अप स्पेशल ट्रेनचे रि-शेड्युलिंग

०२११२ अप अमरावती मुंबई, ०२१०६ अप गोंदिया मुंबई या गाड्यांचे १३ रोजी प्रस्थान स्टेशन पासून ३ तास रि-शेड्युलिंग करण्यात येईल, यासह ०२४४१अप गोरखपूर- लोकमान्य टिळक विशेष प्रस्थान स्टेशन १२ रोजी जळगाव- वसई रोड मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाईल. या गाडीला भिवंडी रोड येथे थांबा देण्यात येईल. हावडा-मुंबई विशेष प्रस्थान स्टेशन १२ रोजी जळगाव,वसई रोड मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस ला जाईल. या गाडीला भिवंडी रोड येथे थांबा देण्यात येणार आहे.

०१२३७ नागपुर-मडगाँव स्पेशल, प्रस्थान स्टेशन १३ रोजी

गाडी क्रमांक ०२६१८ हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम स्पेशल, प्रस्थान स्टेशन १३रोजी, ०२१३८ फिरोजपुर-सीएसएमटी स्पेशल, प्रस्थान स्टेशन १२ रोजी, ०२१९ नागपुर-सीएसएमटी स्पेशल, प्रस्थान स्टेशन १३ रोजी या गाड्यांना इगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान एक ते तीन तासांसाठी रेगूलेट करण्यात येणार आहे.

Web Title: Two days traffic and power block by Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.