सलग दुसऱ्या दिवशी दोन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:40+5:302021-02-11T04:18:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी शहरातील दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी शहरातील दोन बाधितांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात ४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहरातही रुग्णवाढ समोर आली आहे.
गेल्या दोन दिवसात शहरातील तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ८९ वर्षीय पुरुष आणि ७४ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद आहे. शहरातील मृतांची संख्या ३०३ वर पोहोचली आहे. बुधवारी आरटीपीसीआरचे ४३४ अहवाल आलेत, तर १८४ अँटिजन तपासण्या झाल्या. यात अनुक्रमे ३१ आणि १८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप ११७ अहवाल प्रलंबित आहेत.
प्राचार्य बाधित
शहरातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कोरोनाची लागण झाल्याने निष्पन्न झाले आहे. दरम्यान, रायसोनी नगरात एकाच दिवसात ५ बाधित आढळून आले आहेत. यासह सेंट्रल बँक कॉलनी ३, शाहूनगर ३, आदर्शनगर २, राधाकृष्णनगर २, चित्रा चौक, गणेश कॉलनी, मयूर कॉलनी, जिजाऊ नगर, कोल्हे नगर आदी भागांमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.