जळगाव जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:29 PM2018-09-20T17:29:03+5:302018-09-20T17:30:22+5:30

डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या.

Two debt-less farmers suicides in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

जळगाव जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देजळके येथील शेतक-याने केले विष प्राशनहोळपिंप्री येथील शेतक-यांने घेतला गळफासकर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

जळगाव : डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या.
भिमराव प्रल्हाद पाटील (वय ४०, रा.जळके, ता.जळगाव) आणि राजू नामदेव वानखेडे ( रा. होळपिंप्री ता. पारोळा) अशी या शेतकºयांची नावे आहेत. पाटील यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी व खाजगी व्यक्तींकडील कर्ज होते.
तर वानखेडे यांनी स्वत:च्या घरातच गळफास घेतल्याची घटना गुरुवारी पहाटे सहा वाजता घडली. पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे उसनवारीने घेतलेला पैसा कसा फेडायचा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली.
पाटील यांच्याकडे अडीच एकर शेती असून सध्या कापसाची लागवड केली आहे. पाऊस नसल्याचे उत्पन्न जेमतेमच येईल. विविध कार्यकारी सोसायटी व खासगी व्यक्तींकडून त्यांनी कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करणे शक्य होत नसल्याने त्याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली.

Web Title: Two debt-less farmers suicides in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.