दोन उद्योजकांना लाखाचा आॅनलाईन गंडा

By admin | Published: March 6, 2017 01:15 AM2017-03-06T01:15:28+5:302017-03-06T01:15:28+5:30

फसवणुकीचे प्रकार वाढले : क्रेडीट कार्डवरुन परस्पर खरेदी

Two entrepreneurs have to lench online | दोन उद्योजकांना लाखाचा आॅनलाईन गंडा

दोन उद्योजकांना लाखाचा आॅनलाईन गंडा

Next

जळगाव : बॅँकेच्या नावाने मोबाईलवरुन पासवर्ड विचारुन तसेच बक्षीसाचे आमिष देवून आॅनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. औद्यागिक वसाहतीतील एका अभियंता उद्योजकाच्या क्रेडीट कार्डवरुन परस्पर ९६ हजाराची खरेदी झाली आहे तर दुसºया घटनेत  कार खरेदीच्या नावाने उद्योजकास १० हजारात गंडा घालण्यात आला आहे. या दोन्ही उद्योजकांनी रविवारी स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत.
बनावट क्रमांक व खात्याचा वापर
आॅनलाईन फसवणूक करणारी टोळीच देशभरात कार्यरत आहे. खासकरुन बिहार व झारखंड या राज्यातील गुन्हेगारांकडून अशी फसवणूक केली जात आहे. सायबर शाखेने केलेल्या तपासातही गुन्हेगारांचे मोबाईल याच राज्यातील असल्याचे उघड झाले आहे. दुसºयाच्या नावाने मोबाईल सीम कार्ड घेणे व बॅँकेत बनावट नावाने खाते उघडले जाते.

Web Title: Two entrepreneurs have to lench online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.