कुंभारी बुद्रुक येथे शौचालयाचा नियमित वापर करणाºया महिलेला दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 03:47 PM2018-01-15T15:47:29+5:302018-01-15T15:49:46+5:30
साई सुवर्ण बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम
आॅनलाईन लोकमत
तोंडापूर, ता.जामनेर, दि.१५ : साई सुवर्ण बहुद्देशीय संस्थेतर्फे कुंभारी गावामध्ये संक्रांत निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी साई सुवर्ण बहुउद्देशीय संस्थेने केलेल्या आवाहनानुसार सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर करणाºया महिलेला दोन ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रांचे वितरण करण्यात आले.
संत गाडगे बाबा पुण्यतिथी निमित्त गावात स्वच्छता अभियान राबून महिला शौचालयाजवळ एलईडी लॅम्प लावण्यात आला होता. ज्या महिला शौचालयाचा नियमित वापर करतील अशा महिलांसाठी प्रत्येक महिन्यात लकी ड्रॉ काढुन दोन ग्रॅम सोन्याचे पॉलिश असलेले मंगळसूत्र देण्यात येणार होते. त्या प्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन ३०० महिलांना मंगळसूत्र भेट दिले. तसेच लकी ड्रॉ विजेत्या अलका उमराव पाटील यांना शितल जाधव यांच्या हस्ते दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र देण्यात आले.
यावेळी प्रभाकर साळवे यांनी मार्गदर्शन केले. सरपंच सुरतसिंग जोशी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या शीतल जाधव, कैलास कोळी, विलास जोशी, विशाल जोशी, पिराजी जाधव उपस्थित होते. यावेळी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. संस्थेच्या सचिव ज्योतिका साळवे ' कल्पना साळवे, सुनीता साळवे, दुगार्बाई साळवे यांनी आलेल्या महीलाना हळदी कुंकू व वान वाटप केले. यावेळेस गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.