बेलसवाडीत दोन गटात तुंबळ हाणामारी

By admin | Published: June 12, 2017 12:42 PM2017-06-12T12:42:24+5:302017-06-12T12:42:24+5:30

20 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला़

Two groups in Belaswadi have a trumpet clash | बेलसवाडीत दोन गटात तुंबळ हाणामारी

बेलसवाडीत दोन गटात तुंबळ हाणामारी

Next

 ऑनलाईन लोकमत 

मुक्ताईनगर, दि.12 : रोजा इफ्तारच्या वेळी मुलांनी केलेल्या गोंधळावरुन दोन गटात लोखंडी आसारी व दगड फेक होवून हाणामारी झाल्याची घटना 10 रोजी रात्री 8.30 वाजता तालुक्यातील बेलसवाडी गावात घडली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून 20 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ 
10 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास बेलसवाडी गावात रऊफ खान करीम खान यांनी नमाजाच्या वेळी रोजा इफ्तार प्रसंगी मुलांनी केलेल्या गोंधळावरुन त्यांना हटकल्याने त्याचे संशयीत आरोपींना वाईट वाटल्याने त्यावरून हा वाद झाला होता. या प्रकरणी रऊफ खान करीम खान यांच्या फियार्दीवरुन वरील 20 जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शरीफ खॉ काले खॉ,  समद खॉ महेमूद खॉ, अशरफ खॉ भूरे खॉ, रूस्तम खॉ भूरे खॉ  या चौघांना अटक केली आहे.

Web Title: Two groups in Belaswadi have a trumpet clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.