जळगावातील अक्सा नगरात दोन गटात तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 08:20 PM2020-08-31T20:20:57+5:302020-08-31T20:21:12+5:30
माजी नगरसेवकासह पाच जखमी : परस्परविरोधी २८ जणांविरुध्द गुन्हे दाखल
जळगाव : मेहरुणमधील अक्सा नगरात रविवारी सायंकाळी पिरजादे व कुरेशी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. यात लोखंडी सळई व कुºहाडीचा वापर झाला असून दगडफेकही झाली. या घटनेत अनिस कुरेशी अब्दुल सत्तार कुरेशी (२७) त्याची आई हबीबाबी कुरेशी, पत्नी शगुप्ता व भाचा कमरेन बिलाल अहमद असे चार तर दुसऱ्या गटातील माजी नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, पिरजादे व कुरेशी गटाच्या २८ जणांविरुध्द प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नगरसेवक इकबालोद्दीन जियाउद्दीन पिरजादे, दारा इकबालोद्दीन पिरजादे, बबल्या, राजू पिरजादे, सोहेल पिरजादे, मुजाहीद्दीन जहांगीरदार, कपील मुजाहीद जहांगीरदार, जबी
िपरजादे, मुन्नवर पिरजादे, रउफ माजीद, माजीद मिया, दानिश धन्नो, रहीम दादा व जावेद हाफिस यांच्याविरुध्द प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हप्ता आणि गुरे चोरीचा आरोप
या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकावर आरोप केला आहे. कुरेशी गटाने पिरजादे यांच्यावर हप्तखोरीचा तर पिरजादे यांनी कुरेशी गटावर गुरे चोरीचा आरोप केला आहे.
अनिस कुरेशी याने दिलेल्या फिर्यादीनुसार मटण विक्री करण्यासाठी नगरसेवक इकबालोद्दीन पिरजादे यांनी हप्ता व मोफत मटणाची मागणी केली, ते दिली नाही तर गुरे चोरीची खोटी केस दाखल करेल असे धमकाले. त्यास नकार दिला असता वरील १४ जणांनी मारहाण करायला सुरुवात केली. दारा पिरजादे याने डोक्यात कुºहाड टाकली तर इतरांनी लोखंडी सळई व दगडीचा मारा केल्याने कुटुंबातील चार जण जखमी झाल्याचे म्हटले आहे.
इकबालोद्दीन जियाउद्दीन पिरजादे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी दुपारी आपल्या गुरांमधून एक जनावर चोरी गेले होते, त्यासाठी सत्तार शेख गफूर कुरेशी याच्या गोडावूनमध्ये पाहण्यासाठी गेलो असता तेथे कुरेशी याच्यासह त्याचा मुलगा रईस, अनिस, भाऊ मुख्तार, जब्बार असे होते तर भोल्या रशिद कुरेशी, जावेद रशिद कुरेशी, वसीम रशिद कुरेशी, अरबाज महेनूर कुरेशी, बाबु युसुफ कुरेशी, नाजीम कुरेशी, अब्रार मुख्तार कुरेशी, शेख अनिस शेख हयास जामनेरवाला आदी जण आले. त्यांनी आम्ही तुम्हाला चोर दिसतो का? असे म्हणत गोडावूनमध्ये जावू देण्यास नकार दिला. त्यावर पोलिसांना बोलावतो असे म्हटल्याचा राग आल्याने रईस व अनिस कुरेशी यांनी मटण कापण्याच्या सुºयाने हल्ला केला. तर बाकींच्यांनी काठी व दगड विटांचा मारा केला. दरम्यान, या सर्वाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.