ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज घेण्यास विरोध केल्याने दोन गटात हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 22:32 IST2020-12-30T22:32:21+5:302020-12-30T22:32:42+5:30
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अनवर्दे बुद्रुक येथील पाच इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यास देवरे यांनी विरोध केला त्यावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली

ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज घेण्यास विरोध केल्याने दोन गटात हाणामारी
चोपडा जि. जळगाव : वेळेवर अर्ज आल्याने ते घेऊ देण्यास विरोध केल्याने दोन गटात हाणामारी झाली. यात चोपडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना चोपडा तहसील कार्यालयात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अनवर्दे बुद्रुक येथील पाच इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यास देवरे यांनी विरोध केला त्यावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. देवरे यांना जबरदस्त मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर असलेला टोचा घेऊनच हाणामारीला सुरुवात झाली त्यामुळे काही वेळ तहसील आवारात तणाव निर्माण झालेला होता. हाणामारी करताना काही लोक निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अंगावर आले. मात्र शेजारी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. या दोन गटांमध्ये समजोता घडविण्याचा प्रयत्न सुरु होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.