स्वस्त धान्य दुकानांना दोन तास वाढीव वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:32+5:302021-05-23T04:15:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग पाहता गर्दी होऊ नये तसेच निर्बंधादरम्यान गरजूंना धान्याचे पूर्णपणे वाटप व्हावे, यासाठी ...

Two hours extra time to cheap grain stores | स्वस्त धान्य दुकानांना दोन तास वाढीव वेळ

स्वस्त धान्य दुकानांना दोन तास वाढीव वेळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग पाहता गर्दी होऊ नये तसेच निर्बंधादरम्यान गरजूंना धान्याचे पूर्णपणे वाटप व्हावे, यासाठी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. याविषयी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले असून, त्यानुसार आता स्वस्त धान्य दुकाने सकाळी सात ते दुपारी एक यावेळेत उघडी राहणार आहेत.

स्वस्त धान्य दुकाने सकाळी चार तास व दुपारी चार तास उघडी ठेवावीत, असे आदेश आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग पाहता त्यामध्ये बदल करण्यात येऊन सकाळी सात ते अकरा यावेळेत ही दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, सध्या निर्बंध काळात गरजूंना वाटप करण्यात येणाऱ्या धान्याच्या वेळेत व सर्व लाभार्थ्यांना पूर्णपणे लाभ मिळावा, यासाठी दुकानांच्या वेळा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

३१ मेपर्यंत नियमित धान्य वाटपासह प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील धान्याचेदेखील पूर्णपणे वाटप करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिक पडताळणीत सूट

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मे २०२१साठी लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता, स्वस्त धान्य दुकानदारांना स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून ई-पॉसद्वारे धान्य वितरीत करण्याची विशेष मुभा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या सवलतीचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

Web Title: Two hours extra time to cheap grain stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.