बोदवड येथे रेल्वेगेट तुटल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 07:00 PM2018-12-08T19:00:11+5:302018-12-08T19:00:55+5:30
बोदवड , जि.जळगाव : दुचाकीच्या धडकेने येथील रेल्वेगेट तुटल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. शनिवारी दुपारी अडीच ते ...
बोदवड, जि.जळगाव : दुचाकीच्या धडकेने येथील रेल्वेगेट तुटल्याने दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. शनिवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावरील बोदवड रेल्वेस्थानकाजवळचे फाटक रेल्वे येत असल्याने बंद होत होते. तेव्हा त्यात भरधाव दुचाकी गेटमधून जात होती. त्याच वेळी दुचाकीची धडक गेटला लागली. त्यात रेल्वेगेट तुटले व दुचाकीस्वारही फेकले गेले. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले.
रेल्वेगेट तुटल्याने रेल्वेकडून कारवाई होणार या भीतीमुळे दुचाकीधारकांनी घटनास्थळावरून दुचाकी उचलून पळ काढला. मात्र या घटनेने मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती.
बोदवड रेल्वेगेट तुटल्याने रेल्वे कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.