दोनशे ट्रॅक्टर मोजणीच्या प्रतीक्षेत उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 12:15 AM2017-03-17T00:15:15+5:302017-03-17T00:15:15+5:30

जामनेर: बारदान संपल्याने तूर खरेदी ठप्प, शेतकरी हतबल,

Two hundred tractors stand waiting for counting | दोनशे ट्रॅक्टर मोजणीच्या प्रतीक्षेत उभे

दोनशे ट्रॅक्टर मोजणीच्या प्रतीक्षेत उभे

Next

जामनेर : येथील बाजार समिती आवारात सुरू असलेल्या शासकीय  तूर खरेदी केंद्रावर बारदान       संपल्याने गुरुवार सकाळपासूनच खरेदी ठप्प झाली आहे. शासनाने तुरीसाठी हमी भाव जाहीर केल्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात केंद्रावर तूर आणत आहेत. मात्र गेल्या आठवडय़ात ग्रेडर नसल्याने खरेदी बंद होती. ग्रेडर आल्यावर खरेदी सुरू झाली खरी; मात्र आता बारदान संपल्याने पुन्हा खरेदीत विघ्न निर्माण झाले असून नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.
आतार्पयत सुमारे 1 हजार 500 क्विंटल तूर खरेदी झाली असून बाजार समिती आवारात तुरीने भरलेले सुमारे 200 ट्रॅक्टर मोजणीअभावी उभे आहेत. ट्रॅक्टरचे दररोजचे भाडे परवडत नसल्याने शेतक:यांनी तुरीचे पोत्यांचे उघडय़ावर ठेवले आहेत. राज्यातील काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने व वातावरणातील बदल पाहून शेतकरीदेखील उघडय़ावरील तुरीमुळे चिंतेत आहे. व्यापा:यांकडून शेतक:याची तूर चार हजार ते चार हजार दोनशे या भावाने खरेदी केली जात असल्याने शेतकरी शासकीय केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहे. नाफेडकडून खरेदी केलेल्या तुरीची रक्कम शेतक:यांच्या बँक खात्यात आरटीजीएसने जमा होत असून यासाठीसुद्धा दहा ते पंधरा दिवस लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पुढा:यांबद्दल संताप
दरम्यान, तूर उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून पंधरा   दिवसांपासून केंद्रावर थांबावे लागत आहे. केवळ निवडणुकीत मते मागायला येणा:या  राजकारण्यांविषयी शेतक:यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतक:यांच्या समस्यांवर रस्त्यांवर उतरून आंदोलन करणारे पुढारी आता गप्प कसे, असा सवाल विचारला जात आहे.
गेल्या दहा दिवसांपासून तुरीचे ट्रॅक्टर केंद्रावर थांबून आहे. आज खरेदीसाठी नंबर लागला असतानाच बारदान संपल्याने खरेदी बंद झाली. शेतक:यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही.
-उमेश जैन, शेतकरी, तळेगाव
बारा दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात थांबून आहे. आजर्पयत नंबर लागला नाही. वातावरणात बदल होत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास तुरीच्या होणा:या नुकसानीला कोण जबाबदार राहील. मोजणीसाठी काटे वाढवावेत व बारदान लवकर उपलब्ध करून द्यावे.
-शालिग्राम नारायण पाटील,
शेतकरी, चिंचखेडे बुद्रूक
गेल्या आठ दिवसांपासून तुरीचे ट्रॅक्टर घेऊन थांबलो आहे. संथगतीने मोजणी होत असल्याने व मध्येच व्यापा:यांची तूर वशिलेबाजीने मोजली जात असल्याने आमचा नंबर लागत नाही. शेतकरी संघाने याकडे लक्ष घालून शेतक:यांच्या समस्या                   सोडवाव्यात.
-संजय सुरळकर,
शेतकरी, फत्तेपूर लोणी

तूर खरेदी नियमितपणे सुरू होती. मात्र डीएमओ कार्यालयाकडून बारदान पुरवठा होत नसल्याने खरेदी नाइलाजास्तव थांबवावी लागली. बारदान उपलब्ध करावे यासाठी यापूर्वीच त्यांचेकडे मागणी केली आहे. बारदान मिळताच खरेदी सुरू केली जाईल.
-चंद्रकांत बाविस्कर,
चेअरमन, शेतकरी सहकारी संघ

Web Title: Two hundred tractors stand waiting for counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.