नशिराबाद आरोग्य केंद्रात आजपासून दोनशे लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:25 AM2021-05-05T04:25:53+5:302021-05-05T04:25:53+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड लस ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविड लस देण्यात येणार होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक जण ताटकळले आहेत. आता आज मंगळवारपासून नशिराबाद आरोग्य केंद्राला तब्बल तेराशे लस उपलब्ध झाले आहेत. दररोज मात्र नोंदणी झालेल्या २०० जणांनाच लस देण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी आरोग्य केंद्रात लसीसाठी गर्दी करू नये, सर्वांना लस उपलब्ध होणार आहे. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केले आहे. नशिराबाद आरोग्य केंद्राला सुमारे १९ गावे संलग्न आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रांमध्ये लस घेण्याकरिता सर्वाधिक गर्दी होणार नाही, यासाठी अन्य ठिकाणीसुद्धा लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.