फैजपूरच्या दोघा जवानांची मुंबईत उत्तम कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 04:04 PM2019-07-15T16:04:06+5:302019-07-15T16:07:18+5:30
फैजपूर येथील रहिवाशी तथा राष्टÑीय सुरक्षा बलात कार्यरत असलेले मनोज अशोक घोडके व महाराष्ट्र पोलीस दलात सेवारत शरीफ रशीद तडवी या दोघा जवानांनी मुंबईत उत्तम कामगिरी केली आहे.
वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील रहिवाशी तथा राष्टÑीय सुरक्षा बलात कार्यरत असलेले मनोज अशोक घोडके व महाराष्ट्र पोलीस दलात सेवारत शरीफ रशीद तडवी या दोघा जवानांनी मुंबईत उत्तम कामगिरी केली आहे.
वामन कांबळे नामक ज्येष्ठ नागरिक पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर प्रवास करीत असताना प्लॅटफार्मवर उतरून आत्महत्येच्या तयारीत होते. ही घटना परिसरातील प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर ते जोरजोरात बोलू लागले. तेव्हा चालू रेल्वेच्या पटरीवरून उचलून मनोज घोडके यांनी कांबळे यांचा जीव वाचविला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे. यामुळे मनोज घोडके यांचे सर्वत्र कोतुक होत आहे.
तसेच सर जे.जे.मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला व तिचे पती हे प्रवास करीत असताना त्यांच्याजवळील पर्समधील घर खरेदीची रक्कम रुपये नऊ लाख ५० हजार रुपये गहाळ झाली होती. पोलीस कर्मचारी शरीफ तडवी यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करून पैसे संबंधिताना परत केले. या फैजपूरच्या दोघ जवानांच्या उत्तम कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक झाला आहे.