जळगाव जिल्ह्यात वीज पडून दोन जण ठार; तरुण व महिलेचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 08:43 PM2024-08-18T20:43:28+5:302024-08-18T20:44:42+5:30

ईश्वर शांताराम सुशिर (२२, रा. पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर) आणि जुलेखाबी हैदर शा फकीर  (३५, रा. शिंगाडी ता. रावेर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

Two killed by lightning in Jalgaon district Including youth and women | जळगाव जिल्ह्यात वीज पडून दोन जण ठार; तरुण व महिलेचा समावेश

जळगाव जिल्ह्यात वीज पडून दोन जण ठार; तरुण व महिलेचा समावेश

रवींद्र हिरोळे/संकेत पाटील 

जळगाव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तरुणासह महिला ठार झाली. पहिली घटना मुक्ताईनगर व दुसरी घटना रावेर तालुक्यात घडली. दोन्ही घटना रविवारी दुपारी शेतात घडल्या. दरम्यान, शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने वडिलांनी मुलाचा मृतदेह पाठिवर घेत सुमारे दोन किमी पायी चालत आरोग्य केंद्रात आणला. पण तोपर्यत खेळ संपलेला होता.

ईश्वर शांताराम सुशिर (२२, रा. पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर) आणि जुलेखाबी हैदर शा फकीर  (३५, रा. शिंगाडी ता. रावेर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

ईश्वर सुशिर हा पिंप्राळा ता. मुक्ताईनगर शिवारातील स्वतःच्या शेतात आई वडिल, मोठ्या भावासोबत रविवारी खुरपणीसाठी गेला होता. त्यावेळी वीज पडून तो जागीच ठार झाला तर मलिकाबी ही महिला शेतमजूर महिला शिंगाडी येथील शेतीची कामे आटोपून घराकडे परतत असतानाच तिच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ती ठार झाली.

Web Title: Two killed by lightning in Jalgaon district Including youth and women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.