लग्नाची पत्रिका वाटप करुन परतणा-या भावी नवरदेवासह दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:30 PM2019-03-30T23:30:13+5:302019-03-30T23:31:38+5:30
स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटप काही साहित्याची खरेदी करुन घरी परत जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हेमंत उर्फ आकाश दत्तू भिरुड (२७) दोन्ही रा.सावदा, ता.रावेर या भावी नवरदेवासह त्याचा चुलत भाऊ वैभव विजय भिरुड (२०) असे दोन्ही जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजता महामार्गावर नशिराबादजवळील यूपी बॉम्बे ढाबा समोर घडली.
जळगाव : स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटप काही साहित्याची खरेदी करुन घरी परत जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हेमंत उर्फ आकाश दत्तू भिरुड (२७) दोन्ही रा.सावदा, ता.रावेर या भावी नवरदेवासह त्याचा चुलत भाऊ वैभव विजय भिरुड (२०) असे दोन्ही जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजता महामार्गावर नशिराबादजवळील यूपी बॉम्बे ढाबा समोर घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हेमंत याचे २२ एप्रिल रोजी लग्न होते. त्यासाठी या लग्नाच्या पत्रिका व काही खरेदी करावयची असल्याने तो चुलत भाऊ वैभव याला सोबत घेऊन जळगावला आला होता. दिवसभराचे काम आटोपून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बीटी २००१) घरी जात असताना रात्री साडे आठ वाजता भुसावळकडून जळगावकडे येणाºया ट्रकने (क्र.एम.एच.१९.सी.वाय.१९३१) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात चाकाखाली आल्याने दुचाकीवरील वैभव व हेमंत हे जागीच ठार झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, राजेंद्र साळुंखे, गुलाब माळी, अनिल पाटील, किरण हिवराळे,संतोष ईदा यांच्यासह अन्य कर्मचायांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.
नुकताच झाला साखरपुडा
मिळालेल्या माहितीनुसार हेमंत याचा नुकताच साखरपुडा झाला होता तर २२ एप्रिल रोजी लग्न होणार होते. त्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. जळगावात काही खरेदी असल्याने आपणच नातेवाईक व मित्रांना पत्रिका वाटप करु म्हणून हेमंत स्वत: जळगावात आला होता.दरम्यान, अंगाला हळद लागण्यापूर्वीच काळाने झडप घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हेमंत हा रेल्वे कर्मचारी होता. स्मित भाशी मनमिळावू स्वभाव यामुळे तो सर्वांना परिचित होता. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहिण, आजोबा व आजी असा परिवार आहे.