महामार्गावर पुन्हा दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:07 AM2019-02-16T11:07:15+5:302019-02-16T11:10:52+5:30

तीन प्रवासी जखमी

Two killed on the highway | महामार्गावर पुन्हा दोन ठार

महामार्गावर पुन्हा दोन ठार

Next
ठळक मुद्देरिक्षा आणि कारचा अपघात


जळगाव : नशिराबाद महामार्गावर गेल्या आठवडाभरापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रवासी रिक्षा व कार यांच्यात गुरुवारी मध्यरात्री समोरासमोर जोरदार धडक होऊन शेख इम्रान शेख इकबाल उर्फ जानी (३५), शेख जमील शेख अलाउद्दीन (३०) हे ठार झाले.
नशिराबाद महामार्गावरील एका ढाब्यावर जेवणासाठी येथील पाच जण रिक्षेने ( एम.एच.१९/ व्ही.७२२८ ) गेले होते. ढाब्यावर जेवण आटोपून घराकडे परतत असताना रिक्षा व जळगावकडून भुसावलकडे भरधाव वेगात जाणारी कार (एम.एच.१९/ सी.एस.९०९९) यांच्यात जोरदार धडक झाली. त्यात रिक्षा चालक शेख इम्रान शेख इकबाल उर्फ जानी (३५), शेख जमील शेख अलाउद्दीन(३०) दोघे राहणार चौपाल मोहल्ला नशिराबाद हे जागीच ठार झाले. फारुख अली मंजूम अली,(३५), अमीर खान जाबीर खान(४५), मुन्साफअली हयातअली (२६) तिघे रा. नशिराबाद हे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, नामदेव ठाकरे, राजेंद्र साळुंखे, संतोष ईदा, युनूस शेख, चेतन पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. शेख जमील व शेख इमरान या दोघा शेजारी राहणाºया मित्रांची एकाच वेळेला अंतयात्रा निघाली. हे दृष्य पाहून सर्वांचेच डोळे पानावले.
अपघातात पाच दिवसात सहा ठार
गेल्या पाच दिवसात तीन अपघातात सहा जणांना प्राण गमवावा लागला आहे. दहा फेब्रुवारीला ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात तुषार भागवत पाटील हा तरुण ठार झाला होता. १२ रोजी ट्रक व लक्झरीच्या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह तीन जण ठार झाले होते.
बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला
शेख जमील शेख अलाउद्दीन हा तरुण मिस्तरी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. शेख जमीलचा विवाह नूकताच ठरला होता. भुसावळ येथे ९ जून रोजी त्याचा विवाह होणार होता, अशी माहिती मिळाली.

Web Title: Two killed on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात