आमोद्याजवळ अपघातात फैजपूरच्या नगरसेवकाच्या भावासह दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:39 PM2018-03-12T12:39:29+5:302018-03-12T12:39:29+5:30
दुचाकी झाडावर धडकली
आॅनलाइन लोकमत
फैजपूर, जि. जळगाव, दि. १२ - फैजपूर-आमोदा रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात फैजपूर येथील स्वप्नील किशोर निंबाळे (वय ३३), विक्की संजय सोनवणे (वय २४) हे दोघेजण ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास झाला. यातील स्वप्नील निंबाळे हे फैजपूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा शिवसेनेचे शहर प्रमुख अमोल यांचे मोठे बंधू आहेत.
स्वप्नील निंबाळे व विक्की सोनवणे हे दोघेजण रात्री भुसावळकडून दुचाकीने फैजपूरकडे येत होते. रात्री समोरील गाडीच्या प्रकशाने रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी रस्त्याच्या वळणावर झाडावर धडकील. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना सावदा येथे रुग्णालयात हलविले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह यावल रुग्णालयात शविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. या घटनेने फैजपूर शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.