पिंप्राळ्यातही दोन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:18+5:302021-01-14T04:14:18+5:30

पिंप्राळा परिसरातील पांडुरंगनगरात प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशाली सोनवणे व मुलगा यश या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. प्रदीप सोनवणे ...

Two lakh burglary in Pimpri | पिंप्राळ्यातही दोन लाखांची घरफोडी

पिंप्राळ्यातही दोन लाखांची घरफोडी

Next

पिंप्राळा परिसरातील पांडुरंगनगरात प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशाली सोनवणे व मुलगा यश या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. प्रदीप सोनवणे हे एम.आर. म्हणून काम करतात. ११ जानेवारी रोजी पत्नी वैशालीसह ते देवगाव, ता. जळगाव येथे शेतीकामासाठी गेले होते. दोघे तेथेच मुक्कामी थांबले. बुधवारी सकाळी ११ वाजता प्रदीप सोनवणे यांना घराशेजारील पूजा पवार यांनी घरफोडी झाल्याची घटना कळविली. त्यानुसार प्रदीप पत्नीसह जळगावात घरी परतले. घरातील कपाटात ठेवलेली रोकड, दागिने व लॅपटॉप हे दिसून आले नाही. चोरट्यांनी घरातून १० ग्रॅमचे ३० हजारांचे सोन्याचे मेडल, ७ ग्रॅमचे २० हजारांचे सोन्याचे कानातले, १५ ग्रॅमची ४५ हजारांची सोन्याची चेन, ५ ग्रॅमच्या ३० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दीड ग्रॅमचे १ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मणी, १३ ग्रॅम ३४ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या, पेंडल, कानातील बाळी या दागिन्यांसह २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व १६ हजार रुपयांची रोकड, असा एकूण १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत रात्री वैशाली प्रदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सतीश डोलारे करीत आहेत.

Web Title: Two lakh burglary in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.