जळगावातून पोलीस बंदोबस्तात दोन लाख दूध रवाना
By admin | Published: June 3, 2017 01:32 PM2017-06-03T13:32:21+5:302017-06-03T13:32:21+5:30
पाठ फिरविली़ बाजार समितीत मालाची आवक नसल्याने सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर दुप्पट झाल़े
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - शेतक:यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आल्यानंतरही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिस:या दिवशीही जिल्ह्यातील शेतक:यांनी पाठ फिरविली़ बाजार समितीत मालाची आवक नसल्याने सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर दुप्पट झाल़े शनिवारी शहराचा आठवडे बाजार असल्याने शहरातील अनेक विक्रेत्यांनी बाजार समितीत गर्दी केली़ दुप्पट दरवाढीमुळे अनेक जण माल न घेताच रिकाम्या हाती परतल़े येथील बाजार समितीमध्ये मध्यरात्रीपासूनच लिलाव दरम्यान, शनिवारी पोलीस बंदोबस्तात 2 लाख लिटर दूध धुळे, नाशिक, औरंगाबादकडे रवाना झाल़े
राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शेतकरी सहभागी झाले आह़े जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतक:यांकडून आंदोलन करण्यात येऊन शासनाचा निषेध नोंदविण्यात येत आह़े येथील बाजार समितीत जिल्ह्यासह औरंगाबाद, नाशिक, पुणे येथून माल दाखल होतो़ मात्र आंदोलनामुळे नाशिक, पुणे येथून दाखल होणारी वाहने येवू शकलेली नाही़ त्यामुळे मालाची आवक घटल्याने भाजीपाला बाजारात दुप्पट भाववाढ झाली़ या भाववाढीचा फटका सर्वसामन्य विक्रेत्यांसह नागरिकांनाही सहन करावा लागणार आह़े
दूधाचीही आवक घटली
जिल्हा दूधसंघाकडे संपामुळे शेतक:यांनी पाठ फिरविल्याने परिणामी दूधाची आवक घटली़ शुक्रवारी 60 हजार लीटर दुधाचा आवक कमी झाली़ त्याच प्रमाणे शनिवारी सकाळी 30 हजार लीटर दुधाची आवक कमी झाली़ ठिकठिकाणी तीव्र स्वरूपाच्या आंदोलनामुळे शनिवारी जिल्हा दूध संघाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती़ त्यानुसार बंदोबस्तात शनिवारी 2 लाख लिटर दूध, धुळे, नाशिक, औरंगाबादकडे रवाना झाल़े