जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यास दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:36 PM2018-03-26T22:36:53+5:302018-03-26T22:36:53+5:30
रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी लांबविणा-या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला न्या. निलिमा पाटील यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवून २ वर्ष सश्रम कारावास व ४ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दीड वर्षापूर्वी पंकज याने दुचाकी चोरली होती.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २६: रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी लांबविणा-या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला न्या. निलिमा पाटील यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवून २ वर्ष सश्रम कारावास व ४ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दीड वर्षापूर्वी पंकज याने दुचाकी चोरली होती.
राजकुमार लक्ष्मीनारायण वर्मा (वय ५८ रा.बालाजी पेठ, जळगाव) यांची दुचाकी ६ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री साडे आठ वाजता रेल्वे स्टेशन परिसरातून चोरी झाली होती. या प्रकरणी ९ आॅगस्ट २०१६ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पंकज हा चोरीच्या दुचाकीसह कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी नगरात पोलिसांना आढळून आला होता. न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात फिर्यादी राजकुमार वर्मा, तपासाधिकारी वासुदेव सोनवणे व पंच राहूल शांताराम ठाकरे या तिघांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकारतर्फे अॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले.
दूरध्वनी फेकणा-याला आठ हजाराचा दंड
संस्थेविरुध्द कारवाई केल्याचा जाब विचारुन टेबलावरील दूरध्वनी आपटून नुकसान केल्याच्या प्रकरणात पंकज श्रावण सोनार (रा.जळगाव) याला न्या.जी.जी.कांबळे यांच्या न्यायालयाने चार कलमांखाली प्रत्येकी २ हजार या प्रमाणे आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. पंकज सोनार याने २०१५ मध्ये सहायक निबंधक कार्यालयात गोंधळ घातला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम ३५३, ५०४, ५०६ व ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे अॅड.आर.पी.गावीत यांनी काम पाहिले.