दोन महिने उलटूनही सहा लाखांची लूट करणारे लुटारू पोलिसांना गवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 04:30 PM2019-05-05T16:30:28+5:302019-05-05T16:30:54+5:30

तपास थंडावला : भरदिवसा झाला होता गोळीबार

For two months, the villagers have been robbing six lakh robbers | दोन महिने उलटूनही सहा लाखांची लूट करणारे लुटारू पोलिसांना गवसेना

दोन महिने उलटूनही सहा लाखांची लूट करणारे लुटारू पोलिसांना गवसेना

Next


पहूर, ता.जामनेर : भरदिवसा गोळीबार करून सहा लाखांची लूट करणारे लूटारू दोन महिने होऊनही पोलिसांना गवसत नसल्याने पोलिसांचा या प्रकरणातील तपास थंडावल्याची स्थिती आहे.
बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या अजिंठा ट्रेडर्स पंपाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करीत बंदूकीचा धाख दाखवून हवेत गोळीबार करीत त्यांच्या ताब्यातून ६ लाख ३० हजार रुपये घेऊन लूटारुंनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना भरदुपारी दोन महिन्यांपूर्वी जामनेर रोडवर घडली होती. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतांनाही पोलीस तपास थंडावल्याचे दिसून येत आहे. लुटारुंना पोलिसांचा धाक नसल्याचे बोलले जात आहे.
अजिंठा ट्रेडर्स पंपाचे कर्मचारी संजय पारखे व समाधान कुंभार हे पंपाचा भरणा ६ लाख ३० हजार रुपये बँँकेत भरण्यासाठी दुचाकीने जात असताना जामनेर रोडवरील बँकेच्या जवळ ते पोहोचले. यादरम्यान तीन युवक दुचाकी वर येवून या पंंपावरी कर्मचाºयांना सुरुवातीला मारहाण करून बंदूकीचा धाख दाखवित हवेत गोळीबार केला व ६ लाख ३० हजार घेऊन पोबारा केल्याची घटना गेल्या १८ फेब्रुवारी रोजी भरदिवसा घडली होती. याप्रकरणी पहूर पोलिसात जबरी चोरीचा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही गंभीर घटना कर्मचाºयांच्या जिवावर बेतली होती. या घटनेला दोन महिने पंधरा दिवस झाले आहे. पण पोलिसांना एकही धागा यात गवसला नाही. तपास थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. घटनेच्या दिवशी पाचोरा विभागाचे नवनियुक्त डीवाय एसपी ईश्वर कातकडे यांनी पदभार घेतल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांनी लुटारुंच्या शोधासाठी पथके रवाना केल्याचे सांगितले होते. दोन महिने उलटून लुटारू पोलिसांच्या भयमुक्त वातावरणात मुक्त संचार करीत असल्याने पोलीस त्यांना जेरबंद करण्यास अयशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपूर्वी पेठ मधील रहिवासी तथा ठाणे जिल्ह्याचे जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक पंढरीनाथ पाटील यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना गुलदस्त्यातच आहे. याच प्रमाणे कासली येथील महिलेचा खून,वाकडीतील ग्रा.पं. विनोद चांदणे याचे भरदिवसा अपहरण करून दहादिवसानंतर खून झाल्याचे निष्पन्न, वाकोदचा तरूण सराफा व्यापाºयावर प्राणघातक हल्ला, पहूर येथे रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर होणारी दारू विक्री, यामुळे सर्व सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात येवूनकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गुन्ह्याचा आलेख कमी होण्या ऐवजी वाढत आहे. डिवाय एसपींच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लुटारूंना जेरबंद करण्यात पोलीस असमर्थ ठरले. वाकडीतील विनोद चांदणे प्रकरणातही मुख्यसुत्रधार तपासात निष्पन्न झाला नाही.त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काही दिवसांपासून गंभीर बनल्याचे चित्र आहे.

संबंधित लुटारूंच्या मागावर पोलीस असून याबाबत तपास सुरू आहे.
-दिलीप शिरसाट,साहाय्यक पोलीस निरीक्षक पहूर,ता.जामनेर.

Web Title: For two months, the villagers have been robbing six lakh robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.