जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 02:35 PM2020-05-02T14:35:07+5:302020-05-02T14:35:21+5:30

जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 34 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी ...

Two more corona infected patients were found in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next

जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 34 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 32 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. 

या दोन व्यक्तीमध्ये एक 24 वर्षीय तरूण हा मारूतीपेठ, जळगाव येथील असून दुसरी व्यक्ती 21 वर्षीय महिला ही चिचोंल, ता. बाळापूर, जि अकोला येथील असून ती समतानगर जळगाव येथे राहत होती.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 45 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे

Web Title: Two more corona infected patients were found in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव