महामार्गाने घेतले आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 12:23 AM2017-02-21T00:23:30+5:302017-02-21T00:23:30+5:30

दुचाकीस्वारास ट्रकने उडविले : मुक्ताईनगरला वृद्धास तर वरणगावात महिलेस चिरडले

Two more victims took the highway | महामार्गाने घेतले आणखी दोन बळी

महामार्गाने घेतले आणखी दोन बळी

Next

भुसावळ : तालुक्यातील वरणगावसह मुक्ताईनगर येथे भरधाव ट्रकने उडवल्याने एका दुचाकीस्वाराचा अन्य एका महिलेचा ट्रक खाली आल्याने मृत्यू झाला़ सोमवारी झालेल्या अपघातानंतर दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली़
ट्रकचालकांविरुद्ध याप्रकरणी पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़
मुक्ताईनगरात दुचाकीस्वार ठार
मुक्ताईनगर- भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आशिया महामार्गावर रक्षा पेट्रोल पंपालगत घडली़ अज्ञात ट्रकचालक वाहनासह पसार झाला़
अजरुन रामकृष्ण पालवे (वय 60, वंजारीवाडा, मुक्ताईनगर) हे  पहाटे ब:हाणपूर फाटय़ावरील हॉटेलवर विनाक्रमांकाच्या दुचाकीने जात असताना नागपूरकडून भुसावळकडे जाणा:या अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ पहाटेची वेळ असल्याने ट्रकचालक वाहनासह पसार होण्यात यशस्वी झाला़ याबाबत जगन रामकृष्ण पालवे (वय 50) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुरनं़28/2017, भादंवि कलम 304 अ, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़
वरणगावात महिला ठार
वरणगाव, ता.भुसावळ- भरधाव ट्रकची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात वरणगावातील  हमीदाबी शेख इस्माईल (वय 55) ही महिला ट्रकखाली चिरडली जाऊन जागीच ठार झाली. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आशिया महामार्ग क्रमांक 46 वर तळवेल शिवारात पाटील सव्र्हिस सेंटरजवळ हा अपघात झाला़
शहरातील सम्राटनगरातील रहिवासी शेख अफसर  शेख इस्माईल हे त्यांच्या आई हमीदाबी शेख इस्माईल (वय 55) यांच्यासह दुचाकी (क्रमांक एमएच-19-एक्स 6971) ने मुक्ताईनगरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रक (एम़एच़ 34 एम़ 9028) ने जोरदार धडक दिली.
ट्रकची धडक बसताच हमीदाबी खाली पडून ट्रकखाली आल्याने मयत झाल्या़  शेख अफसर यांच्या फिर्यादीवरुन वरणगाव पोलीस ठाण्य्‘ात भादंवि कलम 304, 379, 379, 337 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल अशोक जवरे तपास करीत आहेत. 
तरुणाची आत्महत्या, 24 तासांनंतरही मिळेना मृतदेह
 फैजपूर, ता़यावल-  पिंपरूळ, ता़यावल शिवारातील एका विहिरीत 19 रोजी सायंकाळी 18 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली़ 20 रोजी सायंकाळर्पयत 24 तास उलटल्यानंतरही या तरुणाचा मृतदेह आढळला नाही़ प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाने विहिरीत उडी घेतली़ सोमवारी दिवसभर पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थांनी पानबुडय़ांच्या माध्यमातून मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र विहीर प्रचंड खोल व त्यात भरपूर पाणी असल्याने मृतदेह खोल कपारीमध्ये अडकून पडल्याची शक्यता आह़े 24 तास उलटूनही मृतदेह न सापडल्याने मंगळवारी पुन्हा शोध कार्य सुरू करणार असल्याची माहिती फौजदार साठे यांनी दिली़

Web Title: Two more victims took the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.