खान्देशातील दोन महाविद्यालयांनीच पूर्ण केले ‘नॅक’ मूल्यांकनाचे तीसरे सर्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 09:48 PM2017-11-10T21:48:44+5:302017-11-10T21:50:09+5:30

उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाºया खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी आतापर्यंत ८१ महाविद्यालयांनी ‘नॅक’मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले आहे. ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे तर केवळ २ महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

Two pandeys colleges completed the 'nak' third round of evaluation | खान्देशातील दोन महाविद्यालयांनीच पूर्ण केले ‘नॅक’ मूल्यांकनाचे तीसरे सर्कल

खान्देशातील दोन महाविद्यालयांनीच पूर्ण केले ‘नॅक’ मूल्यांकनाचे तीसरे सर्कल

Next
ठळक मुद्दे८१ महाविद्यालयांनी पूर्ण केले नॅक मूल्यांकनाचे पहिले सर्कल५५ महाविद्यालयांनी पूर्ण केले दोन सर्कलग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांसाठी एकच नियम

आॅनलाईन लोकमत

अजय पाटील
जळगाव-दि.१०-उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाºया खान्देशातील ८३ अनुदानित महाविद्यालयांपैकी आतापर्यंत ८१ महाविद्यालयांनी ‘नॅक’मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले आहे. ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे तर केवळ २ महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महाविद्यालयांना शासनाकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर ५ वर्षात ‘नॅक’कडून महाविद्यालयांचे मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. राष्टÑीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (नॅक) या संस्थेकडून महाविद्यालयांची तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया सुविधा, वर्षभर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम याव्दारे महाविद्यालयांना मानांकन दिले जाते. मानांकनानुसार महाविद्यालयांना शासनाकडून अनुदान दिले जाते. खान्देशात महाविद्यालयांना नॅकची तपासणी करून घेण्याबाबत सहसंचालकांकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार महाविद्यालयांमध्ये नॅक समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयांची तपासणी पूर्ण केलीहोती.

२ महाविद्यालयांनी अद्याप केले नाही मूल्यांकन
खान्देशातील ८३ पैकी ८१ अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनाचे पहिले सर्कल पूर्ण केले असले तरी अद्याप २ महाविद्यालयांनी नॅकचे पहिले सर्कल देखील पूर्ण केलेले नाही. यामध्ये धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील पी.बी.बागल महाविद्यालय व अक्कलकुवा येथील रुरल महाविद्यालयाचा समावेशअसल्याचीमाहितीडॉ.तुपेयांनीदिली.

५५ महाविद्यालयांनी पूर्ण केले दोन सर्कल
प्रत्येक महाविद्यालयाला नॅक मूल्यांकन तपासणी समितीकडून तीन सर्कल पूर्ण करून घ्यायवयाचे असतात. खान्देशातील ५५ महाविद्यालयांनी नॅकचे दुसरे सर्कल पूर्ण केले असून, त्याआधारावर महाविद्यालयांना मूल्यांकन देण्यात आले आहे.२८ महाविद्यालयांनी अद्याप दुसरे सर्कल पूर्ण केलेले नाही. तर केवळ दोन महाविद्यालयांनी नॅकचे तिसरे सर्कल पूर्ण केले आहे. यामध्ये भुसावळ येथील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाने २०१५ मध्ये सर्कल पूर्ण केले. तर अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाने गेल्याच महिन्यात हे सर्कल पूर्ण करून ‘ए प्लस’ चे मानांकन प्राप्त केलेआहे.

ग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांसाठी एकच नियम
१.‘नॅक’ समितीकडून महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणी केल्यानंतर अ किंवा ब मानांकन मिळविणाºया महाविद्यालयांमध्ये शहरी भागातील महाविद्यालयांचा समावेश मुख्यत्वेकरून आहे. नॅकचे मानांकन ठरविताना महाविद्यालयाकडून दिल्या जाणाºया सुविधा पाहताना ग्रामीण भागातील महाविद्यालय व शहरी भागातील महाविद्यालयांसाठी एकच नियम आहे.


२. यामुळे ग्र्रामीण भागातील महाविद्यालये नामांकन मिळविण्यास कमी पडतात अशी तक्रार काही महाविद्यालयांकडून होत आहे. तपासणी करत असताना ज्या महाविद्यालयात इतर राज्यातील किंवा परदेशातील शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची माहिती घेतली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील महाविद्यालय कमी पडत असल्याची तक्रार ग्रामीण भाागातील महाविद्यालयांची आहे.

कोट..
आतापर्यंत २ महाविद्यालयांनी नॅक समितीकडून करण्यात येणाºया तपासणीचे तिसरे सर्कल पूर्ण केले आहे. लवकरच तीन सर्कल पूर्ण करणाºया महाविद्यालयांची संख्या महिनाभरात वाढेल. तसेच ज्या दोन महाविद्यालयांनी अद्याप नॅकचे पहिले सर्कल पूर्ण केले नाही. त्या महाविद्यालयांमध्ये देखील लवकरच नॅक समितीकडून तपासणी केली जाणार आहे. नॅक मूल्यांकन हे महाविद्यालयांना बंधनकारक आहे.
-डॉ.केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग

Web Title: Two pandeys colleges completed the 'nak' third round of evaluation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.