जळगाव जिल्हा रुग्णालयात एकाच खाटेवर दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 10:11 PM2017-09-09T22:11:01+5:302017-09-09T22:15:21+5:30

हाल : रुग्णसंख्या वाढल्याने जागा अपूर्ण

Two patients on the same bed in Jalgaon District Hospital | जळगाव जिल्हा रुग्णालयात एकाच खाटेवर दोन रुग्ण

जळगाव जिल्हा रुग्णालयात एकाच खाटेवर दोन रुग्ण

Next
ठळक मुद्देजागा कमी पडत असल्याने एकाच खाटेवर दोन-दोन रुग्णगेल्या महिनाभरापासून थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ9 व 13 क्रमांकाच्या कक्षासह आपत्कालीन कक्षातही जागा कमी

ऑनलाईन लोकमत

 

जळगाव, दि. 9 - दिवसेंदिवस थंडी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे  येथील जागा कमी पडत असल्याने एकाच खाटेवर दोन-दोन रुग्ण टाकण्याची वेळ  आली आहे. 
गेल्या महिनाभरापासून थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने खाजगी रुग्णालयात गर्दी  वाढलेली आहे. सोबतच जिल्हाभरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात येत असल्याने येथेही जागा कमी पडत आहे. थंडी-तापासह सर्पदंश, विषप्राशनच्या रुग्णांचीही संख्या वाढू लागल्याने 9 व 13 क्रमांकाच्या कक्षासह आपत्कालीन कक्षातही जागा कमी पडत आहे. 
पुरुषांचा 9 क्रमांकाचा व महिलांच्या 13 क्रमांकाचा कक्ष हा थंडी, ताप, सर्पदंश, विषप्राशनच्या रुग्णांसाठी आहे. हे रुग्ण वाढत असल्याने येथे जागा कमी पडत आहे. त्यामुळे एका खाटेवर दोन रुग्ण टाकावे लागावे लागत आहे. या सोबतच आलेल्या गंभीर रुग्णांना प्रथम आपत्कालीन कक्षात दाखल करावे लागते, त्यामुळे तेथेही जागा कमी पडते. 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी आलेल्या प्रत्येक रुग्णावर येथेच उपचार करण्यात यावे, एकही रुग्ण बाहेर जाता कामा नये, अशी तंबी दिल्याने रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातच उपचार केले जात असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येणा:या रुग्णांची संख्या वाढत आहे. महिला रुग्णालयाचे काम झाल्यानंतर येथे जागा उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे या रुग्णालयाचे काम मार्गी लागण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. 

जिल्हा रुग्णालयात येणा:या व त्यांच्यावर उपचार करण्यात येणा:या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आहे त्या सोयी-सुविधेत रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक. 

Web Title: Two patients on the same bed in Jalgaon District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.