हिरापूर येथे दोघांवर विळ्याने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 09:41 PM2018-11-06T21:41:19+5:302018-11-06T21:44:16+5:30

हिरापुर, ता.चाळीसगाव येथील शामकांत वसंत जोशी (वय ५४, रा.हिरापुर) व रवींद्र सखाराम जाधव (वय ४५, रा.हिरापुर) यांच्यावर भाऊसाहेब शामराव पाटील (रा.करजगाव) या माथेफिरूने विळ्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले.

Two people were gambhir in a strike at Hirapur | हिरापूर येथे दोघांवर विळ्याने प्राणघातक हल्ला

हिरापूर येथे दोघांवर विळ्याने प्राणघातक हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देहल्ल्यानंतर ग्रामस्थांनी दिला चोपमाथेफिरूविरूद्ध गुन्हा दाखलदोन जण गंभीर जखमी

हिरापूर, ता. चाळीसगाव : हिरापुर, ता.चाळीसगाव येथील शामकांत वसंत जोशी (वय ५४, रा.हिरापुर) व रवींद्र सखाराम जाधव (वय ४५, रा.हिरापुर) यांच्यावर भाऊसाहेब शामराव पाटील (रा.करजगाव) या माथेफिरूने विळ्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले. रविवार ४ रोजी संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडली.
शामकांत वसंत जोशी हे हिरापुर येथील काळंबेश्र्वर महादेव मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतात. तर रवींद्र सखाराम जाधव हे काळंबेश्र्वर महादेव मंदिराच्या बांधकामाठिकाणी रोजंदारीने काम करतात. शामकांत जोशी यांची तब्बेत खराब असल्याने पाच ते सहा दिवसांपासून मंदिरावर गेलेले नव्हते. ४ रोजी सायंकाळी ते मंदिरावर साफसफाई व देवदर्शनासाठी गेले होते. रवींद्र सखाराम जाधव हे उपस्थित होते.
विळा फेकल्याने अनर्थ टळला
सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान दोघेही मंदिरावरून घरी येण्यासाठी पायी निघाले असतानाच अचानक रवींद्र जाधव यांच्या मानेवर धारदार विळ्या ने हल्ला झाला. जाधव यांनी त्यानंतर शामकांत जोशी यांना मदतीसाठी आवाज दिला. जोशी यांनी माथेफिरुला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने त्यांच्यावरही विळयाने वार केला. त्यात शामकांत जोशी ही गंभीर जखमी झाले. त्या स्थितीत जोशी यांनी त्या माथेफिरुच्या हातातील विळा हिसकावून लांब फेकल्याने मोठा अनर्थ टळला.
ग्रामस्थांनी दिला चोप
या प्रकारानंतर ग्रामस्थांनी त्या माथेफिरुला पकडून बेदम चोप दिला. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत त्याला एका सलून दुकानात डांबून ठेवले होते. त्यानंतर उपस्थितांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. काही वेळेनंतर पोलीस घटनास्थळी हजर होऊन त्या माथेफिरुला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two people were gambhir in a strike at Hirapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.