जळगावात वाहनाच्या हॉर्नमुळे बैल बिथरले, दुचाकीवरील दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:41 PM2018-04-28T12:41:18+5:302018-04-28T12:41:18+5:30

दुचाकी बैलगाडीवर धडकली

Two people were injured in a wheelchair due to the horn of a vehicle | जळगावात वाहनाच्या हॉर्नमुळे बैल बिथरले, दुचाकीवरील दोघे जखमी

जळगावात वाहनाच्या हॉर्नमुळे बैल बिथरले, दुचाकीवरील दोघे जखमी

Next

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - चारचाकी वाहनाचा हॉर्न वाजल्याने बैलगाडीचे बैल बिथरले व बाजूने जाणारी दुचाकी बैलगाडीवर धडकल्याने झालेल्या अपघातात विनोद शालीक भील (४५) व शांताराम पावरा, दोघे रा. खेडी खुर्द, ता. जळगाव हे जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजता शहरातील प्रजापतनगरात घडला.
विनोद भील व शांताराम पावरा हे खेडी खुर्द येथून जळगाव शहराकडे दुचाकीने येत होते. ते प्रजापतनगरात पोहचले असता त्या वेळी एका मोठ्या वाहनाचा हॉर्न वाजला व बाजूने जाणाऱ्या बैलगाडीचे बैल बिथरले. यावेळी भील यांची दुचाकी या बैलगाडीवर धडकली. त्यात हे दोघेही जण जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Two people were injured in a wheelchair due to the horn of a vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.