जळगाव येथे संशयावरुन वाद, ‘एलसीबी’त दोन पोलीस कर्मचा-यांमध्ये ‘फ्री-स्टाईल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:55 PM2017-11-21T12:55:46+5:302017-11-21T13:02:04+5:30
आठवडाभरात ‘खाकी’चा दुस-यांदा धिंगाणा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 21 -22 स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात सोमवारी सकाळी 11.30 वाजता दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन पोलीस कर्मचा:यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बीट बदल केल्याच्या कारणावरुन दोन वर्षापासून या कर्मचा:यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु होती, ती सोमवारी हाणामारीच्या माध्यमातून उफाळून आली.
या हाणामारीची पोलीस दलात जोरदार चर्चा आहे. पाच दिवसांपूर्वी शिघ्र कृती दलातील कर्मचा:यांनी दारु पिऊन जिल्हा क्रीडा संकुलात धिंगाणा घातला होता. या घटनेची पोलीस दलात चर्चा सुरु असताना आज पुन्हा एकदा दोन कर्मचा:यांनी चक्क पोलीस मुख्यालयाचत हाणामारी केल्याने पोलीस दलाची नाचक्की झाली आहे.
काय आहे नेमका वाद?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या कार्यकाळापासून स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचा:यांमध्ये दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट एकमेकाचे कट्टर विरोधक म्हणून आजही वावरत आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी 13 कर्मचा:यांना ‘एलसीबी’मधून बाहेर काढले होते. राजेशसिंह चंदेल यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचे सूत्रे आल्यानंतर ईश्वर सोनवणे या कर्मचा:याचे बीट बदल करण्यात आले. दिलीप येवले यांच्या सांगण्यावरुनच हे बीट बदल झाल्याचा गैरसमज झाल्यामुळे सोनवणे व येवले यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी या दोघांचे व प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविण्यात आले.
अन् ठिणगी पडली
सोमवारी सकाळी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे हे हजेरी मास्तरच्या खोलीत असताना धक्का लागल्याच्या कारणावरुन शाब्दीक वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. यात कर्मचा:याचे कपडेही फाटले. शेजारीच पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांचे कार्यालय व त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी पाहता कर्मचा:यांनी हा वाद सोडविला. त्यानंतर दोन्ही कर्मचारी वेगळे झाले.
मुख्य सूत्रधार पडद्याआड..
येवले व सोनवणे यांच्यात झालेल्या हाणामारीत मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याची चर्चा कर्मचा:यांमध्ये होती. हा सूत्रधार सोनवणे यांना भेटल्यानंतर पुन्हा या दोघांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस दलाची नाचक्की
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बीट व आर्थिक व्यवहार हे दोनच मुख्य कारणे या दोन्ही कर्मचा:यांच्या वादामागे आहेत. हाणामारी झाले तेव्हा कार्यालयात एकही अधिकारी नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे हे तरसोद फाटय़ाजवळील एटीएम फुटल्याने तपासाचे नियोजन करण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या दालनात होते. त्यानंतर कराळे व कुराडे हे घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामुळे या हाणामारीची सायंकाळर्पयत त्यांना माहिती नव्हती, अशी माहिती मिळाली. सायंकाळर्पयत संपूर्ण शहरात या घटनेची माहिती वा:यासारखी पसरली होती.15 नोव्हेंबर रोजी चार कर्मचा:यांनी दारु पिऊन मध्यरात्री जिल्हा क्रीडा संकूल परिसरात धिंगाणा घालून कुंडय़ा व बॅनर फाडल्याची घटना घडली होती. ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तेच हाणामारी करतात, धिंगाणा घालतात..या प्रकारामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.