भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये जोखमीच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 08:26 PM2019-05-18T20:26:23+5:302019-05-18T20:27:14+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ हॉस्पिटलमध्ये दोन अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. पहिल्या केसमध्ये २४ सेंटीमीटरचा लोखंडी रॉड शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला, तर दुसºया केसमध्ये ८० वर्षाच्या वृद्धाच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ हॉस्पिटलमध्ये दोन अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. पहिल्या केसमध्ये २४ सेंटीमीटरचा लोखंडी रॉड शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला, तर दुसºया केसमध्ये ८० वर्षाच्या वृद्धाच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
भुसावळ येथील ५५ वर्षीय रेल्वे कर्मचाºयाच्या पोटात २४ सेंटीमीटरचा लोखंडी रॉड घुसला होता. तो गुद्दद्वारामार्गे घुसलेला होता. या अत्यंत जोखमीच्या शस्त्रक्रिया मध्य रेल्वेच्या हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक डॉ.सारय्या, डॉ.पवन यांनी मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.पी.के सावंतराय व सहाय्यक चिकित्सा अधीक्षक डॉ.श्रवण कुमार यांच्या सहकार्याने रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत जोखमीची ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून २४ सेंटीमीटरचा रॉड बाहेर काढला.
दुसºया केसमध्ये ८० वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाºयास हृदयविकार, बीपी, अस्थमा यासारख्या समस्या होत्या. त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीमध्ये फ्रॅक्चर झाले होते. याचेही निदान डॉ.रवीतेजा, डॉ.शंकर, डॉ.सतीश यांच्या टीमने दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर यशस्वीरित्या पार पाडले. आता वयोवृद्ध रुग्ण वॉकरच्या साह्याने चालण्या योग्य झाले आहे.
अत्यंत जोखमीच्या या शस्त्रक्रिया रेल्वे हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. एरवी छोट्या-छोट्या उपचारासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठविण्यात येत असे. परंतु भुसावळच्या रेल्वे रुग्णालयात जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. ही मध्य रेल्वेच्या भुसावळ हॉस्पिटलसाठी मोठी उपलब्धी आहे, भविष्यात तज्ज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा हॉस्पिटलमध्ये रुग्णास मिळतील, असा विश्वास मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.पी.के. सावंतराय यांनी व्यक्त केला आहे.