नियमभंग केल्याने भुसावळला दोन दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:48 PM2020-06-18T17:48:54+5:302020-06-18T17:49:43+5:30
पालिका पथकाची कारवाई
भुसावळ: कोरोना पाश्वभूमीवर शहरांमध्ये व्यावसायिकांसाठी दुकान उघडण्याचे दिवस व वेळ निश्चित करण्यात आले आहे. मात्र याचे पालन न करता चुकीच्या दिवशीदुकान उघडल्यामुळे दोन दुकान सील करण्याची कारवाई पालिकेने गुरुवारी केली आहे.
शहरामध्ये बाजारपेठेत गर्दी कमी व्हावी, व्यवहार सुरळीत व्हावे याकरिता प्रशासनातर्फे व्यावसायिकांसाठी दिवस व वेळ निश्चित करण्यात आले आहे .मात्र जळगाव रोडवरील लक्ष्मी इंटरप्राईजेस तसेच स्टेशन रोडवरील शिवाजी इंटरप्राईजेस ही दोन्ही इलेक्ट्रिकची दुकाने गुरुवारी त्यांचा वार नसतांना उघडण्यात आले, याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने तसेच मुख्याधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील नगर अभियंता पंकज पन्हाळे, संजय बाणाईते, सुरज नारखेडे, शेख परवेज अहमद, विशाल पाटील, राजेश पाटील, पोलीस कर्मचारी दीपक शिंदे यांनी ही दोन्ही दुकाने सील केलीत.
शहरामध्ये नियुक्त करण्यात आलेले वेगवेगळे पथक सातत्याने गस्त घालत असून नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे.