मेहरूण तलावात दोघा विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू

By admin | Published: March 26, 2017 12:37 AM2017-03-26T00:37:03+5:302017-03-26T00:37:03+5:30

नंदुरबारहून ‘अभियांत्रिकी’च्या शिक्षणासाठी आले होते जळगावी

Two students drown in the Mehran lake | मेहरूण तलावात दोघा विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू

मेहरूण तलावात दोघा विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू

Next

जळगाव : मेहरूण तलावात पोहायला गेलेल्या बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकीच्या दोन विद्याथ्र्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घडली. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. भूषण प्रकाश पाटील (वय 21, रा.वर्धमाननगर, नंदुरबार) व निखिल विजय पाटील (वय 20, रा.हुडको कॉलनी, नंदुरबार) अशी मृत विद्याथ्र्याची नावे आहेत.
अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू असल्याने दुपारी लवकर महाविद्यालयातून सुट्टी होते. भूषण पाटील, निखिल पाटील यांच्यासह मयूर गोसावी (रा.धुळे), चैतन्य पटेल (रा.नंदुरबार) व अंकुश सूर्यवंशी (रा.जळगाव) हे पाच विद्यार्थी शनिवारी दुपारी अडीच वाजता मेहरूण तलावाजवळ आले. शेती शिवाराला लागून असलेल्या तलावाकडून पाचही जण  तलावात पोहायला उतरले. निखिल व भूषण या दोघांना पोहता येत नव्हते.
अन् दोघं बाहेर आलेच नाहीत
तलावात पोहत असताना मयूर, चैतन्य व अंकूर हे तिन्ही जण पावणे तीन वाजेच्या सुमारास बाहेर आले, मात्र निखिल व भूषण हे दोघे बाहेर आलेच नाही. दोघंही बुडाल्याचे पाहून बाहेर असलेल्या तिघांनी आरडाओरड केली.  एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, शरद भालेराव या दोघांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पट्टीच्या पोहणा:यांना पाचारण करण्यात आले. दीड तासाच्या परिश्रमानंतर भूषणपाठोपाठ निखिलचा मृतदेह हाती लागला. जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे उर्दू शिक्षक असलेल्या पिरजादे निकारासिध्दी मिसवाऊद्दीन यांनी दोघांना अवघ्या 15 मिनिटांच्या आत बाहेर काढले.

भूषणचे कुटुंबीय सुरतेत स्थायिक
भूषण हा मूळचा नंदुरबार आहे. त्याचे वडील व आई रोजगारा- निमित्त सुरतला स्थायिक झाले आहेत. वडील वेल्डिंगचे काम करतात तर लहान भाऊ मितेश हादेखील शिरपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.     भूषण हा सिव्हिलच्या दुस:या वर्षाला शिकत होता.

निखिलच्या घरी प्रचंड आक्रोश
नंदुरबारच्या हुडको कॉलनीत निखिलचे कुटुंबीय स्थायिक आहेत.  निखिलचे वडील विजय पाटील हे नंदुरबार तालुका विधायक समितीच्या नंदुरबारच्या आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना निखिलसह एक मुलगी आहे.  निखिल हा मेकॅनिकल ट्रेडच्या पहिल्या वर्षाला होता. दोघेही कॉलेज वसतिगृहात रहात होते.

Web Title: Two students drown in the Mehran lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.