इंग्रजीच्या पेपरला दोन विद्यार्थी डीबार

By admin | Published: March 1, 2017 12:30 AM2017-03-01T00:30:49+5:302017-03-01T00:30:49+5:30

कॉपी मुक्त अभियानाचे तीन-तेरा : परीक्षा केंद्राबाहेर युवकांच्या झुंडी

Two students dubbing the English paper | इंग्रजीच्या पेपरला दोन विद्यार्थी डीबार

इंग्रजीच्या पेपरला दोन विद्यार्थी डीबार

Next

जळगाव- उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात येणा:या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. इंग्रजी  विषयाच्या पहिल्याच  पेपरला जिल्ह्यातून दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यामुळे त्यांना डिबार करण्यात आले. शहरातील अनेक केंद्रावर सर्रासपणे कॉपी सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाकडून कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा पहिल्याच पेपरच्या दिवशी फज्जा उडाल्याचे चित्र शहरातील परीक्षा केंद्रावर पहायला मिळाले.
बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. यंदा इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरुवात झाल्याने शिक्षण विभागाकडून परीक्षेदरम्यान  काही गैरप्रकार होवू नये यासाठी संबधित केंद्र संचालकांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र पहिल्याच दिवशी शहरातील अनेक केंद्रावर कॉपी बहाद्दराकडून सर्रासपणे कॉपी केली.
नुतन मराठा केंद्रावर दोन डिबार
राज्य मंडळाकडून नियुक्त करण्यात आलेल्या  पथकाकडून शहरातील  नूतन मराठा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यामुळे त्यांना डिबार करण्यात आले. राज्य परीक्षा मंडळाच्या सदस्या शुभांगी राठी यांनी ही कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही विद्याथ्र्याकडून उत्तरपत्रिका  जमा करून नवीन उत्तरपत्रिका देण्यात आल्या. तसेच त्यांना इतर पेपर देता येणार असले तरी, या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर कोणत्याही केंद्रावर कारवाई झाली  नसल्याचेही शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
पालकांची गर्दी
शैक्षणिक दृष्टीने बारावीचे वर्ष अंत्यत महत्वाचे असते.  बारावीचा पहिलाच पेपर असल्याने मंगळवारी परीक्षा केंद्रावर विद्याथ्र्यासोबतच पालक वर्गाने देखील मोठी गर्दी केली होती. बैठक क्रमांक शोधण्यासाठी विद्यार्थी आपल्या पालकांसोबत परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजेपासून दाखल झाले होते. तर अनेक पालक पेपर संपेर्पयत परीक्षा केंद्र परिसरात उपस्थित होते.
कॉपी पुरविण्यासाठी युवकांच्या झुंडी
इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्राबाहेर विद्याथ्र्याना कॉपी  पुरविण्यासाठी टवाळखोरांची मोठी गर्दी केली होती. नुतन मराठा  महाविद्यालयांच्या मागच्या बाजूस पेपर सुटेर्पयत युवक गटाने उभे होते. अनेकदा पोलीसांकडून युवकांना पळवून लावले. मात्र पोलीस गेल्यावर लगेच युवकांची गर्दी पहायला मिळाली. तर बबन बाहेती महाविद्यालय व अॅँग्लो उदरु हायस्कूलच्या केंद्राबाहेर देखील युवकांची गर्दी होती. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
अर्धातासातच कॉपी सुरु
परीक्षा सुरु झाल्यानंतर काही केंद्रावर अवघ्या अर्धातासातच कॉपी सुरु झाली होती. काही केंद्रावर केंद्र संचालकाकडून कडक उपाययोजना केल्या होत्या मात्र काही केंद्रावर सर्रासपणे कॉपी सुरु होती.पथकाकडून परीक्षा केंद्रावर भेटच्या दरम्यानच कॉपी बंद होती. पथक गेल्यानंतर पुन्हा वर्गामध्ये कॉपी  सुरु होती.   केंद्रामधील वर्गाच्या खिडक्या तोडून कॉप्या पुरविल्या गेल्या.

Web Title: Two students dubbing the English paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.