अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात दोघं संशयित शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:01 PM2020-08-21T12:01:44+5:302020-08-21T12:01:53+5:30

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या दाखल गुन्ह्यात फरार असलेला तेजस दिलीप सोनवणे (२०) व चेतन पितांबर सोनार (२०) ...

Two suspects surrender in case of atrocities on a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात दोघं संशयित शरण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात दोघं संशयित शरण

googlenewsNext

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या दाखल गुन्ह्यात फरार असलेला तेजस दिलीप सोनवणे (२०) व चेतन पितांबर सोनार (२०) हे दोघंही संशयित गुरुवारी सायंकाळी शनी पेठ पोलिसांना शरण आले. सायंकाळी उशिरा त्यांची वैद्यकिय तपासणी करुन अटकेची नोंद घेण्यात आली. शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तेजस दिलीप सोनवणे याने २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुचाकीवर बसवून कोल्हे हिल्स टेकडीवर नेऊन बळजबरीने बलात्कार केला होता.
याचवेळी चेतने मोबाईलमध्ये चोरुन फोटो काढले होते. या फोटाचा आधार घेऊन चेतन यानेही ब्लॅकमेल करुन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने शनी पेठ पोलिसात दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे व दिनेशसिंग पाटील करीत आहेत.

सर्व पर्याय संपल्याने आले पोलिसांना शरण
१३ आॅगस्ट रोजी चेतन व तेजस या दोघांविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून दोघंही फरार झाले होते. शनी पेठ व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते. अटकेची कारवाई टाळण्यासाठी सर्व पर्याय संपल्याने पोलिसांना शरण येणे हाच एकमेव पर्याय त्यांच्याजवळ उरला होता.

Web Title: Two suspects surrender in case of atrocities on a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.